केवळ हिंदूंना लक्ष्य करून नामोहरम करणे, हा दंगलींमागील षड्यंत्राचा उद्देश !

भारतातील धार्मिक दंगली : समस्या आणि उपाय

भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्कळ जुना आहे. हा सारा इतिहास कुणी लिहून काढतो म्हटले, तर एक मोठा ग्रंथ होईल. भारतात हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये काही ना काही कारणास्तव अनेक वेळा धार्मिक दंगली होत असतात. या धार्मिक दंगलींची समस्या आणि त्यावरील उपाय याविषयीचे विस्तृत लिखाण येथे देत आहोत. २२ जानेवारी २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘कायद्याच्या दृष्टीने मुसलमानांना मुभा आणि हिंदूंना दुय्यम वागणूक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येविषयी मुसलमान नेत्यांकडून केली जाणारी विधाने, सैन्यभरतीची ‘अग्नीपथ’ योजना आणि त्यावरून दंगलखोरांनी केलेला विरोध’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (भाग ४)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/647494.html

१. पोलीस खाते म्हणजे हिंदूंसाठी ‘कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ’ !

‘राजकीय नेत्यांकडून मतांसाठी मुसलमान समाजाचा सातत्याने आणि अतिरेकी अनुनय केला जातो. मुसलमानांचा उद्दामपणा आणि त्यांची गुन्हेगारी वृत्ती यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, त्यामुळेही भारतात धार्मिक दंगलींना अक्षरशः ऊत आला आहे. शासनकर्ते असणारे नेतेच जेव्हा मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळू लागतात, तेव्हा प्रशासन तर पुढार्‍यांच्या एक पाऊल पुढे टाकत त्यांच्यासमोर गुडघे टेकून रांगायला लागते. पोलीस खाते तर या संदर्भात सर्र्वांत पुढे असल्याचे दिसून येते. हिंदूंच्या दीपावलीसारख्या महत्त्वाच्या सणाला हिंदूंना मिठाई तर सोडून द्या; पण साध्या शुभेच्छाही न देणारे पोलीस खाते ‘रमजान’चे निमित्त साधत मुसलमानांना मात्र सन्मानाने बोलावून पोलीस ठाण्याच्या आवारात ‘इफ्तार’ची मेजवानी देते. मोठे पोलीस अधिकारीही मुसलमान मुला-मुलींच्या हातात मिष्टान्नाची ताटे स्वतः आणून देतात. तेव्हा नवल वाटल्याविना रहात नाही. पोलीस खाते एकीकडे मुसलमानांचा अनुनय करता करता दुसरीकडे हिंदूंवर मात्र अन्याय करतांना कधीच मागे-पुढे पहात नाही. लाचार नेते आणि त्यांच्या तालावर बोटावर नाचणारे पोलीस खाते हिंदूंसाठी ‘कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ’ ठरले आहे.

श्री. शंकर गो. पांडे

२. हिंदूंपेक्षा मुसलमानांच्या भावना जपण्यात तत्पर असणारे पोलीस !

या देशात हिंदूंना आपला खरा इतिहास मांडणेही कठीण झाले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाचा कोथळा वाघनखाने बाहेर काढत आहे’, असे चित्र आता कुणालाही कुठेही लावता येत नाही. अशा चित्रामुळे म्हणे मुसलमानांच्या भावना दुखावतात. काही मासांपूर्वी धुळ्याच्या ४ हिंदुत्वनिष्ठ युवकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज गाय कापणार्‍या कसायाचे हात कापतात’, असे छायाचित्र ‘फेसबुक’वर प्रसारित केले होते. परिणामतः त्या चारही युवकांना अटक करण्यात आली. हिंदु देवीदेवतांचा अवमान करणारी अनेक छायाचित्रे आणि ध्वनीचित्रफिती (व्हिडिओ) मुसलमानांकडून ‘फेसबुक’वर प्रसारित केल्या जातात; पण त्यांना कधी अटक केल्याचे ऐकिवात येत नाही. काही मासांपूर्वी मुंबई येथे श्रीरामनवमीच्या निमित्ताने ‘वज्रदल’ नावाच्या हिंदु संघटनेने एक शोभायात्रा काढली होती. त्या शोभायात्रेत ‘हिंदू पलायन – हिंदू घटा देश बटा’, अशी घोषणा असणारा एक फलक प्रदर्शित करण्यात आला होता. खरेतर फलकावरील लिखाण वस्तूस्थितीला धरून होते. ज्या भागात हिंदु अल्पसंख्य होतात, तो भाग राष्ट्रीय प्रवाहापासून वेगळा होतो, हे एक ऐतिहासिक सत्य आहे. ही शोभायात्रा धारावी येथील मुसलमानबहुल भागात आली. तेव्हा हिंदूंपेक्षा मुसलमानांच्या भावना जपण्यात तत्पर असणारे पोलीस लगेच समोर आले. फलकावरील लिखाणामुळे मुसलमानांच्या भावना दुखावतील; म्हणून पोलिसांनी ‘तो फलक एक तर काढून टाकावा किंवा तो झाकून टाकावा’, अशी सूचना आयोजकांना दिली; पण हिंदूंनी नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी शोभायात्रा रोखून धरली. अखेर हिंदूंनी नाईलाजाने तो फलक झाकला. विशेष म्हणजे शोभायात्रा हिंदूबहुल भागात आली, तरी शेवटपर्यंत त्या फलकावरचे आच्छादन पोलिसांनी काढू दिले नाही.

३. तक्रार घेण्याविषयी हिंदू आणि मुसलमान यांच्यातही तुष्टीकरण करणारे पोलीस !

नूपुर शर्मा यांच्या विरुद्धची रझा अकादमीच्या इरफान शेख यांची तक्रार पोलिसांनी तात्काळ नोंदवून घेतली. इतकेच नव्हे, तर भारतात जेथे म्हणून त्यांच्याविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या, त्या सर्व तक्रारी पोलीस खात्याकडून तत्परतेने नोंद करण्यात आल्या; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी नागपूर येथे अत्यंत नीच आणि प्रक्षोभक भाषेचा वापर करणार्‍या शेख हुसेन यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. नंतर पुष्कळ दबाव आल्यानंतर कुठे नाईलाजाने शेख हुसेन विरुद्ध ‘एफ्.आय.आर्.’ नोंदवण्यात आला; पण लागलीच शेख हुसेन यांना जामीन देऊन त्यांना मोकळे सोडण्याची तत्परताही पोलीस खात्याकडून दाखवण्यात आली. शेख हुसेन यांना तात्काळ जामीन मिळेल, अशीच किरकोळ कलमे लावण्याची दक्षता (खबरदारी) पोलीस खात्याने अगोदरच घेतली होती; कारण त्यांना तत्कालीन आघाडी शासनातील मंत्र्यांची मर्जी राखायची होती; पण हिंदूंविरुद्ध तक्रार नोंदवतांना मात्र हिंदुद्वेष्ट्या नेत्यांची मर्जी राखण्यासाठी राजद्रोह किंवा देशद्रोह अशा कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात येतात. जेणेकरून शासनकर्त्यांविरुद्ध भूमिका घेणार्‍या हिंदूंना महिनोगणती जामीन मिळू नये. याचा प्रत्यय वृत्तनिवेदक अर्णव गोस्वामी, अभिनेत्री केतकी चितळे, अपक्ष खासदार नवनीत राणा, अभिनेत्री कंगना राणावत, भाजप नेते तथा खासदार नारायण राणे अशा अनेकांविरुद्ध तक्रारी नोंदवतांना आला आहे.

४. देशातील वाढत्या हिंसाचाराविषयी विरोधी राजकीय पक्षांनी व्यक्त केलेली चिंता आणि त्या पक्षांचा काळा इतिहास !

या देशात धार्मिक तणाव कोण वाढवतात, हिंदूंविरुद्ध सातत्याने प्रक्षोभक भाषा कुणाकडून केली जाते, मुसलमानांना भडकावणारे कोण आहेत, पूर्वनियोजित पद्धतीने कोण दंगली घडवून आणतात’, याची माहिती सर्व राजकीय पक्ष, तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आणि मानवाधिकारवाले यांना पुरेपूर असते; पण भाजप सोडून बाकी सर्वच राजकीय पक्षांकडून दंगलखोरांऐवजी हिंदूंनाच सांप्रदायिक ठरवले जाते. एप्रिल २०२२ मध्ये भाजपाविरुद्ध असणार्‍या ११ राजकीय पक्षांनी देशातील वाढत्या सांप्रदायिक हिंसाचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त केली. त्या वेळी ‘अशा घटनांमध्ये सहभागी असणार्‍या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, याविषयीचे एक निवेदन शासनाला दिले होते. या निवेदनातून ‘‘सत्ताधारी पक्षाचे लोक (अर्थातच हिंदू) हे खाणे-पिणे, वेशभूषा, श्रद्धा या सूत्रांवरून समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्ही फार व्यथित आहोत; पण पंतप्रधान मात्र मौन धारण करून आहेत’’, असा आरोप करण्यात आला होता.

या निवेदनावर काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, साम्यवादी पक्षाचे सीताराम येचुरी आणि डी. राजा, तृणमूल काँग्रेसच्या ममता बनर्जी, द्रमुकचे एम्.के. स्टॅलिन, झारखंड मुक्ती मोर्च्याचे हेमंत सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आणि ‘ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’चे देवव्रत विश्वास यांच्या स्वाक्षर्‍या होत्या. या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करणार्‍या वरील नेत्यांचा इतिहास आणि वर्तमान पाहिला, तर तो हिंदुद्वेषाने बरबटलेला दिसतो. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देहलीमध्ये ३ सहस्र शिखांना वेचून वेचून मारण्यात आले होते. निवेदनावर स्वाक्षरी करणार्‍या सोनिया गांधींना स्वतःच्या पक्षाने केलेली ही सांप्रदायिक हिंसा दिसत नाही का ? कम्युनिस्टांचे (साम्यवाद्यांचे) हात तर अनेक हिंदूंच्या रक्ताने माखलेले आहेत. बंगालमध्ये त्यांची सत्ता असतांना आणि आता केरळमध्ये ते सत्तेसाठी केलेल्या आघाडीत सामील असतांना रा.स्व. संघ अन् भाजप यांच्या सहस्रो कार्यकर्त्यांच्या निर्घृणपणे हत्या करण्यात आल्या. अद्यापही त्यात खंड पडला नाही. ममता बॅनर्जी यांच्या हिंदुद्वेषाविषयी काय आणि किती बोलावे ? बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या राजवटीत मुसलमान कट्टरतावाद्यांकडून सहस्रो हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. तेथे हिंदूंचे जीवित, वित्त आणि शील यांपैकी काहीही सुरक्षित नाही. हिंदूंना ना स्वतःचे सणवार साजरे करता येतात, ना शोभायात्रा काढता येतात. ममता बॅनर्जी यांच्या छत्रछायेखाली तेथील मुसलमान, बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर यांना मात्र हवा तसा नंगानाच करण्याची मोकळीक आहे. त्यामुळे तेथून हिंदू हळूहळू विस्थापित होऊ लागले आहेत. निवेदनावर स्वाक्षरी करणारे फारूख अब्दुल्ला यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच काश्मीरमधून वर्ष १९९० मध्ये ५ लाख हिंदू विस्थापित झाले. सहस्रो हिंदू स्त्रियांचे शील लुटले गेले.

५. देशातील हिंदुद्वेष्ट्यांची कोल्हेकुई म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा !

आता हेच हिंदुद्वेष्टे नेते भाजपच्या राजवटीला आणि हिंदूंना सांप्रदायिक अन् दंगलखोर ठरवत आहेत. या देशातील हिंदु समाज ना कधी दंगलखोर होता ना सांप्रदायिक. तो सहिष्णु आणि शांतताप्रेमी असल्यामुळेच त्याला स्वतःच्याच मातृभूमीतून विस्थापित व्हावे लागत आहे. तो स्वतःच्याच देशात आपले सण-उत्सव मोकळेपणाने साजरे करू शकत नाही. निर्धास्तपणे अमरनाथची यात्रा करू शकत नाही. मुळात या देशात सध्या हिंदूच अधिक असुरक्षित झाला आहे; पण असुरक्षित झाल्याच्या बोंबा मात्र मुसलमानांकडून मारण्यात येतात आणि अशा देशद्रोही मुसलमानांच्या बेसूर सुरात या देशातील हिंदुद्वेष्टे स्वतःचाही सूर मिळवतात. याला ‘चोरांच्या उलट्या बोंबा’ नाही, तर अन्य काय म्हणावे ?

६. अमेरिकेकडून भारत आणि हिंदू यांच्याविरुद्ध केला जाणारा अहवाल हा एका आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचाच भाग

अशा हिंदुद्वेष्ट्यांचे अस्तित्व केवळ भारतापुरतेच मर्यादित नाही, तर ते अनेक देशांत पसरलेले आहे. अमेरिकेतील हिंदुद्वेष्ट्यांकडून वर्ष २०२१ मध्ये एक ‘धार्मिक स्वातंत्र्य अहवाल’ प्रकाशित झाला होता. त्यात म्हटले होते, ‘भारतातील अल्पसंख्य मुसलमान आणि ख्रिस्ती हे असुरक्षित आहेत. या लोकांवर जमावाकडून (अर्थातच हिंदूंकडून) आक्रमणे केली जातात, जमावाकडून त्यांची हत्या केली जाते. भारतातील काही राज्यांनी धर्मांतरविरोधी कायदेही संमत केले आहेत. दंगली भडकल्यास केवळ मुसलमानांवरच कारवाई केली जाते.’ भारत आणि देशातील हिंदूंविरुद्ध एवढा विपरीत अहवाल सिद्ध करणे, हा एका आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचाच भाग आहे. अमेरिकेतील ‘इंडियन मुस्लीम कौन्सिल’ ही अमेरिकेत हिंदूंविरुद्ध द्वेषपूर्ण बातम्या प्रसारित करण्याचे काम करत असते. अर्थात् एखाद्या मुसलमान संघटनेने भारताविरुद्ध बातम्या प्रसारित करणे यात काही नवल नाही; पण त्या बातम्यांवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनीही विश्वास ठेवावा, याला आंधळेपणा नाही, तर अन्य काय म्हणावे ? या अहवालातील आरोपांची कोणतीही शहानिशा न करता ब्लिंकन यांनी भारताला दोष दिला होता; पण हेच धूर्त अमेरिकन नेते पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या इस्लामी राष्ट्रांत हिंदु, बौद्ध, शीख आणि जैन समाजावर तेथील धर्मांधांकडून किती अनन्वित अत्याचार होतात अन् तेथील शासनकर्तेही या अत्याचारांकडे किती तटस्थपणे पहातात, याविषयी मात्र चकार शब्दही उच्चारत नाही.

७. ‘संयुक्त राष्ट्रां’नी मांडलेला भारताविषयीचा दूषित दृष्टीकोन !

जून २०२२ मध्ये संयुक्त राष्ट्रांत ‘द्वेषयुक्त भाषणाचा सामना’ या आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यात असे आवाहन करण्यात आले होते, ‘भारताने केवळ अब्राहमिक (एकेश्वरवादी) धर्माविषयीच नव्हे, तर शीख, बौद्ध, जैन आणि हिंदु धर्मांसह सर्व धर्मांविरुद्ध द्वेष अन् हिंसाचाराचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून एकत्रित प्रयत्न करावेत.’’ संयुक्त राष्ट्रांनीही भारताविषयी असा दूषित दृष्टीकोन ठेवावा, याचे नवल वाटते. हिंदु धर्माचा गाभाच मुळात सहिष्णुतेचा आहे. ‘अन्य धर्मांचा आदर करणे’, हा गुणधर्म हिंदूंच्या ‘डी.एन्.ए.’मध्येच (अनुवंशिक) आहे; म्हणूनच फार पूर्वीपासूनच भारताने यहुदी, पारशी, ख्रिस्ती, मुसलमान, तिबेटीयन, बौद्ध अशा अनेक धर्मियांना आपल्या देशात उदार आश्रय दिला.

या सर्वांना त्यांच्या धर्मानुसार धार्मिक आचरण करणे, प्रार्थनास्थळ उभारणे यांचे स्वातंत्र्य दिले. शक, हूण, कुशाण या परकीय आक्रमकांना आपल्यात सामावून घेतले. तरीही ‘संयुक्त राष्ट्रां’कडून भारताला ‘सांप्रदायिक सौहार्दा’चा (एकोप्याचा) उपदेश केला जातो. तेव्हा ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ स्वतः कोरडे पाषाण’, ही म्हण किती सार्थ आहे, याचा प्रत्यय येतो. एक बरे झाले की, या वेळेस ‘संयुक्त राष्ट्रां’नी भारताला अनाठायी केलेल्या उपदेशाविषयी भारताने आपली भूमिका सडेतोडपणे मांडून त्यांचा अभिप्राय कसा निरर्थक आहे, हे दाखवून दिले.

८. अमेरिकेतील ‘रेटगर्स’ विश्वविद्यालयाने हिंदूंची अपर्कीर्ती करणारा अहवाल सिद्ध करणे

अमेरिकेतील ‘रेटगर्स’ विश्वविद्यालयातील संशोधकांनी सिद्ध केलेला एक अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. या अहवालातील निष्कर्षानुसार हिंदूंची जगभरात अपकीर्ती कशी होईल, असे षड्यंत्र रचले गेले आहे. या षड्यंत्रांतर्गत इराणसह अनेक इस्लामी देशांतील सरकारी यंत्रणेद्वारेच हिंदुविरोधी आणि जगाची दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे. त्यामुळेच जुलै २०२२ या एका मासात भारतात हिंदूंच्या हत्या आणि त्यांच्याविषयी अपशब्द वापरण्याचे प्रमाण पुष्कळ वाढलेले दिसते. भारतात मुसलमानांचा नरसंहार चालू असल्याने खोटे चित्र रंगवण्यात येत आहे. ‘रेटगर्स’ विश्वविद्यालयातील हिंदुद्वेष्ट्या प्राध्यापिका ऑडी ट्रश्के या हिंदुद्वेषी मोहिमेचे नेतृत्व करत आहेत.

९. देशात हिंदूच सर्वाधिक असुरक्षित आणि मुसलमान होत आहेत उद्दाम !

एकंदरीत या देशात हिंदू सोडून बाकी सर्व अल्पसंख्यांक विशेषतः मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मीय अिधक शोषित अन् पीडित असल्याचे चित्र रंगवण्याचे एक षड्यंत्र आंतरराष्ट्रीय पातळीवरून रचण्यात येत असल्याचे दिसून येते. केवळ हिंदूंनांच लक्ष्य करून त्यांना नामोहरम करणे, हा या षड्यंत्राचा उद्देश आहे; पण वस्तूस्थिती मात्र भिन्न आहे. या हिंदूबहुल देशात हिंदूच सर्वाधिक असुरक्षित असून मुसलमान समाज दिवसेंदिवस अधिक आक्रमक आणि उद्दाम होत चालला आहे. हिंदु समाजाने जातपातींसह अन्य भेद आणि वाद विसरून संघटित होत वरील षड्यंत्राचा सामना केला पाहिजे. अन्यथा येत्या २०-२५ वर्षांत या देशात हिंदु-मुसलमान दंगलींचे आणि हिंदूंच्या हत्यांचे प्रमाण अतोनात वाढून हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आल्याविना रहाणार नाही.’

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ (९.१.२०२३)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/653518.html