मध्यप्रदेशात समान नागरी कायद्यासाठी समितीची स्थापना होणार

भोपाळ (मध्यप्रदेश) – उत्तराखंड आणि गुजरात या राज्यांनंतर आता भाजपशासित मध्यप्रदेशनेही राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा केली. मुखमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या संदर्भात एका समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

बडवाणी येथील एका सभेत शिवराजसिंह चौहान म्हणाले की, एका देशात दोन कायदे कशासाठी ? एकच कायदा असणे आवश्यक आहे. देशातच आता समान नागरी कायदा झाला पाहिजे.