बांगलादेशमध्ये धर्मांध तरुणाकडून भारतीय विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण

भारतीय विद्यार्थीनी आणि तिचा प्रियकर अब्दुल वकील (डावीकडे)

ढाका (बांगलादेश) – येथील ढाका नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये शिकणार्‍या एका भारतीय विद्यार्थीनीवर तिचा प्रियकर अब्दुल वकील याने एका उपाहारगृहाच्या खोलीमध्ये ३ दिवस बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

१. या तरुणीने फेसबूकवर लिहिले आहे की, अब्दुल वकील याने कॉक्स बाजारमधील हॉटेल गॅलेक्सीच्या खोली क्रमांक ५०१ मध्ये ८ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२२ या ३ दिवसांत माझ्यावर बलात्कार केला. माझ्याकडील पैसे आणि माझा भ्रमणभाष संच चोरला. आता तो माझ्या आई-वडिलांना ठार करण्याची धमकी देत आहे. कृपया मला न्याय द्यावा. तो डॉ. हलीमा खातून नर्सिंग इन्स्टीट्यूट, मेमनसिंह मधील विद्यार्थी आहे. माझ्यासारख्या एका विदेशी विद्यार्थीनीच्या सुरक्षेसाला मोठा धोका आहे.

२. या तरुणीने अब्दुल याला जाकिया नावाची मुसलमान महिला साथ देत असल्याचाही आरोप केला आहे. या मुलीने ‘अब्दुलचे मित्र आणि काही पत्रकार माझ्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करत आहेत’, असाही आरोप केला आहे. या संदर्भात तिने साहाय्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

भारत सरकारने अशा घटनांमध्ये आरोपींवर कारवाई करण्यासाठी बांगलादेशवर दबाव निर्माण करावा आणि तेथे शिकत असणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असेच भारतियांना वाटते !