झारखंडमधील न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्येच्या प्रकरणी दोषींना जन्मठेपेची शिक्षा

न्यायाधीश उत्तम आनंद (उजवीकडे)

धनबाद (झारखंड) – येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्येच्या प्रकरणी गेल्या मासात विशेष सीबीआय न्यायालयाने लखन वर्मा आणि राहुल वर्मा यांना दोषी ठरवले होते. त्यांना न्यायालयाने जन्मठेप आणि ३० सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.

उत्तम आनंद हे सकाळी बाहेर चालण्यासाठी गेले असतांना त्यांना आरोपींनी रिक्शाची धडक दिली होती. त्यांच्याकडील भ्रमणभाष संच हिसकावण्यासाठी ही धडक दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. या धडकेमुळे उत्तम आनंद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. गेल्या २८ जुलै २०२१ या दिवशी ही घटना घडली होती.