चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकलाई यांच्या विरोधात करणी सेनेची मुंबई पोलिसांत तक्रार प्रविष्ट

अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना, प्रमुख

मुंबई, ७ जुलै (वार्ता.) – हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महाकालीदेवीचा अवमान केल्याप्रकरणी ‘काली’ या माहितीपटाच्या निर्मात्या लीना मणीमेकलाई यांच्या विरोधात श्री. अजयसिंह सेंगर यांनी ७ जुलै या दिवशी मुंबई पोलिसांकडे ‘ऑनलाईन’ तक्रार प्रविष्ट केली.

या तक्रारीमध्ये श्री. अजय सिंह सेंगर यांनी म्हटले आहे की,

१. काँग्रेसने अकबर, बाबर, टिपू सुलतान या हिंदुविरोधी अत्याचारी शासकांचे उदात्तीकरण केले.

२. ‘पी.के.’, ‘पद्मावती’ हे चित्रपट, ‘तांडव’ ही ‘वेबसीरिज’ आणि आता ‘काली’ हा माहितीपटात हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करण्यात आला आहे.

३. इस्लाम आणि ख्रिस्ती यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, तेव्हा सरकार त्वरित नोंद घेते. ‘काली’ या माहितीपटाच्या भित्तीपत्रकामध्ये हिंदु देवतेच्या वेशातील एका स्त्रीला सिगारेट ओढतांना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या माहितीपटाच्या विज्ञापनाचे भित्तीपत्रक आणि माहितीपट यांवर बंदी घालण्यात यावी.