कॅनडातील इमामावर लैंगिक अत्याचाराचा आरोप

प्रतिकात्मक छायाचित्र

ओटावा – कॅनडाच्या ओंतारियो प्रांतातील ब्रॅम्प्टन शहरातील एका मशिदीच्या इमामाने (इस्लामच्या धार्मिक नेत्याने) एका महिलेवर लैंगिक अत्याचार केला. आरोपी इमामाने ब्रॅम्प्टन शहरातील एका महिलेच्या घरात मध्यरात्री प्रवेश केला. इमाम तिच्या ओळखीचा होता. इमामाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित महिलेने सांगितले, अशी माहिती पील विभागीय पोलिसांनी दिली. या इमामाच्या लैंगिक अत्याचाराला अन्य महिलाही बळी पडल्याची शक्यता असून त्या दिशेने चौकशी चालू आहे, असे पोलिसांनी सांगितले.