ध्वनीक्षेपकावरील अजान : अन्य धर्मियांच्या धर्मस्वातंत्र्यावर घाला !

इस्लामी देशांत अजानवर प्रतिबंध असतांना धर्मनिरपेक्ष भारतात मोकळे रान का ?

आपल्या देशात अनेक दशकांपासून धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली अजान चालू आहे. आज या अजानविषयी देशातील अनेक लोक त्यांची मते मांडत आहेत. अजान नेमके काय आहे ? त्याचा प्रारंभ कुठून झाला आणि काळानुसार ती देण्याच्या पद्धतीमध्ये पालट होण्याची आवश्यकता आहे का ? यांविषयी या लेखात पहाणार आहोत.

१. अजानचा अर्थ

अजान हा खरोखरच अल्लाचा आदेश आहे, असे जर कुणाला वाटत असेल, तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. कुराण किंवा हदिस यांच्यानुसार कुठेही अजान हा इस्लामचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद नाही. अजान ही जुन्या काळातील आवश्यकता होती आणि ती कालांतराने पूर्ण बंद व्हायला हवी होती; परंतु त्याची पुढे परंपरा बनली. ‘अजान’ हा एक अरबी शब्द आहे आणि त्याचा अर्थ ‘आवाहन करणे’ असा  होतो. तसेच व्यक्ती किंवा समूह यांना एका ठिकाणी आमंत्रित करण्याच्या क्रियेलाही ‘अजान’ म्हणतात.

२. महंमद पैगंबर यांनी यहुदींकडून सामूहिक प्रार्थनेची संकल्पना घेणे आणि मुसलमानांना बोलावण्यासाठी घंटीचा वापर करणे

मूळात सामूहिक प्रार्थना करण्याची संकल्पना ख्रिस्ती किंवा यहुदी धर्मापासून इस्लाममध्ये आली. याचा संदर्भ पैगंबर महंमद यांच्या बालपणीच्या कथेतून मिळतो. पैगंबर महंमद त्यांच्या बालपणी जेव्हा सीरियामध्ये त्यांच्या काकांसमवेत व्यवसायानिमित्त जात होते, त्या वेळी त्यांचा संबंध तेथील यहुदी आणि ख्रिस्ती लोकांशी येत होता. यहुदी आणि ख्रिस्ती लोक सामूहिक प्रार्थना करायचे. त्या वेळी पैगंबर महंमद ‘सामूहिक प्रार्थना’ या संकल्पनेने प्रभावित झाले आणि त्यांनी यहुदी पंथापासून ही संकल्पना घेतली. तोपर्यंत अरबी संस्कृतीमध्ये सामूहिक प्रार्थना करण्याविषयीचा कोणताही संदर्भ इतिहासात आढळत नाही.

इस्लामच्या प्रारंभीच्या काळात २ वेळा नमाजपठण केले जात असे; मात्र कालांतराने पैगंबर महंमद यांनी मुसलमानांना ५ वेळा नमाज वाचण्याचा आदेश दिला. प्रारंभीच्या काळात पैगंबर महंमद सामूहिक प्रार्थनेच्या वेळी २ लाकडांच्या पट्ट्या एकमेकांवर वाजवून बोलवायचे. असे अनेक वर्षे चालल्यानंतर एका सहाबाच्या (पैगंबर महंमद यांच्या सोबत असलेल्यांपैकी एक) यांच्या सूचनेनुसार त्यांनी लाकडी पट्ट्यांच्या ऐवजी घंटीचा वापर करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर सर्व मुसलमान घंटीच्या आवाजाने प्रार्थना करण्यासाठी एकत्र येऊ लागले.

३. अजान ओरडून सांगायची पद्धत केव्हापासून चालू झाली ?

वर्ष ६२२ मध्ये पैंगबर महंमद आपांपसातील मतभेदांमुळे मक्का सोडून मदिनेमध्ये स्थलांतरित झाले. काही काळानंतर एक दिवस एक सहाबा पैगंबर महंमद यांच्याकडे आला आणि त्याने ‘रात्री स्वप्नात काय पाहिले’, ते सांगितले. तो पैगंबर यांना म्हणाला की, माझ्या स्वप्नात हिरवे कपडे घातलेला एक मनुष्य आला आणि त्याने मला ‘मशिदीवरून जोरजोरात ‘अल्ला हूं अकबर’, असे ओरडायला सांगून सर्वांना प्रार्थनेसाठी बोलावण्याचे आवाहन कर’, असे सांगितले. पैंगबर महंमद यांनी ते मान्य केले आणि त्या दिवशीपासून ‘घंटीऐवजी ओरडून अजान द्यावी’, असा आदेश दिला.

४. खलिफांनी अजानची प्रथा बंद न केल्याने त्याचे रूपांतर परंपरेत होणे

सध्या हा आदेश खरोखरच पाळला जातो का ? मोठमोठे भोंगे लावून खरंच पैगंबर महंमद यांच्या हदिसचे पालन होत आहे का ? सलाफी मुसलमान आजही मशिदींवर लावलेल्या भोंग्यांच्या विरोधात आहेत. त्यांच्या मते अल्लाच्या उपासनेसाठी कुठल्याही यंत्राचा वापर करणे, हे इस्लाममध्ये मोठे ‘शिर्क’ म्हणजे पाप आहे. त्यामुळे ‘अजान ध्वनीक्षेपकांवरून लावणे’, हा पवित्र कुराण आणि पैगंबर महंमद यांच्या शिकवणीचा अपमान होत नाही का ? पैगंबर महंमद गेल्यानंतर इस्लामचा सुवर्णकाळ चालू झाला होता. सत्ता, संपत्ती, भूमी सर्व खलिफांच्या कह्यात होते. त्या वेळी खलिफांनी अजानची प्रथा बंद करायला हवी होती; परंतु त्यांच्याकडून तसे न झाल्याने ही प्रथा मग परंपरा झाली.

५. अजानमुळे भारतीय राज्यघटनेने अन्य धर्मियांना दिलेल्या धर्मस्वातंत्र्यावर घाला घातला जाणे

अजानमध्ये काही ओळी आहेत, ज्या ध्वनीक्षेपकांवरून ओरडून सांगितल्याने भारतीय राज्यघटनेने अन्य धर्मियांना दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याविषयी प्रश्न निर्माण होतात. त्या ओळी खालीलप्रमाणे आहेत.

अश-हदू अल्ला-इलाहा इल्लल्लाह
अश-हदू अन्ना मुहम्मदर ससूलुल्लाह

या ओळींचा अर्थ आहे, मी साक्ष देतो की, अल्लाखेरीज कुणीही उपासनेस पात्र नाही. मी साक्ष देतो की, महंमद सल्ल अल्लाचा दूत आहे. जी अल्लाखेरीज कुणीच पूजण्यायोग्य नाही.

असे आहे, तर मग बाकी धर्मांतील देवतांचे काय ? त्यांचा अपमान होत आहे. त्यामुळे एका धर्मनिरपेक्ष देशात ही कट्टरता योग्य आहे का ? इतके असूनही इतर धर्म आणि न्यायव्यवस्था यांविषयी हिंदू प्रश्न उपस्थित करत नाहीत; कारण या देशाच्या संस्कृतीमध्ये ‘दुसऱ्या धर्मांचा आदर करा’, हा संस्कार रुजलेला आहे आणि याच गोष्टींचा अपवापर एका विशिष्ट धर्माचा समुदाय करत आहे. (संदर्भ : सिरत रसुल्लाह – इबणा इसाक, हदिस अल् बुखारी – महंमद अल् बुखारी)

६. अनेक मुसलमान देशांनी अजानवर विविध प्रतिबंध घालणे

आज अनेक इस्लामी देशांनी ८० डेसीबलहून अधिक आवाजातील अजानला प्रतिबंध केलेला आहे. सौदी अरेबिया या देशाने केवळ शुक्रवारी होणाऱ्या नमाजासाठीच अजान म्हणण्यास ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास अनुमती दिली आहे. इराण-इराक यांसारख्या कट्टर इस्लामी देशांतही सार्वजनिक ठिकाणी अजानच्या आवाजावर निर्बंध लादले आहेत.

मग भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात हा नियम का लागू होत नाही ? मशिदींवरील भोंगे उतरवल्याने कुठेही इस्लाम धोक्यात येणार नाही. पूर्वीच्या काळी जर पैंगबर महंमद यांनी पालट केले, तर मग आज हा पालट का होऊ शकत नाही ? यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत, त्यांच्या भावना तर अफझलला फाशी मिळाल्यावरही दुखावल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी मुसलमानांनी याकडे धार्मिक अंगाने न पहाता राष्ट्रीय विषय म्हणून पहावा. आज पैगंबर महंमद असते, तर त्यांनी नक्कीच मशिदीवरचे भोंगे काढायला लावले असते.’

– संकेत राव, इतिहास अभ्यासक, अकोला

(साभार – सामाजिक संकेतस्थळ)