ठाणे सेवाकेंद्रातील साधकांनी (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांच्या चरणी अर्पण केलेले कृतज्ञतारूपी कवितापुष्प !

आज फाल्गुन कृष्ण पक्ष द्वादशी (२९.३.२०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांचा ४९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे सेवाकेंद्रातील साधकांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेले कृतज्ञतारूपी कवितापुष्प येथे दिले आहे.

सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर

‘सद्गुरु अनुताई साधकांसाठी अखंड झटत असतात. ‘साधकांनी घडावे, त्यांनी साधनेत पुढे पुढे जावे’, याची त्यांना साधकांपेक्षाही अधिक तळमळ असते. त्यांनी आम्हा साधकांना जे दिले, ते शब्दातीत आहे. 

सद्गुरु अनुताई, तुम्हीच या अबोध अन् अज्ञानी जिवांमध्ये गुरुचरणांची ओढ निर्माण केली ।

तुम्हीच या अबोध-अज्ञानी
जिवांमध्ये गुरुचरणांची ओढ निर्माण केली ।
तुम्हीच प्रेमाने हात धरून एकेक
सेवा करायला शिकवली ।। १ ।।

तुम्हीच एकेका प्रसंगातून ‘स्व’चा त्याग करायला शिकवले ।
अन् साधनेतील आनंद घ्यायला
शिकवून भवसागरातून मुक्त केले ।। २ ।।

जेव्हा मन नकारात्मक होऊन
एकटेपणा जाणवायला लागला ।
तेव्हा तुम्हीच ते जाणून मोकळेपणाने
बोलायला शिकवले ।। ३ ।।

जेव्हा आध्यात्मिक त्रासाने मन
अस्थिर होऊन सर्व नकोसे वाटू लागते ।
तेव्हा तुमच्या प्रीतीमय शब्दांनी
मनाला संघर्ष करण्याचे बळ मिळते ।। ४ ।।

मायेत भरकटलेल्या या जिवांना
तुम्हीच गुरुकृपेचा मार्ग दाखवला ।
तुम्हीच या शुष्क चित्तांमध्ये
भावाचा ओलावा निर्माण केला ।
अन् तुम्हीच या अस्थिर मनांमध्ये श्रद्धेची दृढताही निर्माण केली ।। ५ ।।

तुम्ही या भित्र्या बालकांचे
आध्यात्मिक त्रासाचे भय दूर केले ।
तुम्हीच निर्भय बनवून
स्वभावदोष-अहंशी लढायला शिकवले ।। ६ ।।

आम्हा सर्वांचा तुमच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार…।
आणि तुमच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता…।। ७ ।।

‘प्रत्येक जन्मात आम्हाला गुरुचरणांच्या
सेवेचे भाग्य लाभू दे’, ।
अशी गुरुचरणी संपूर्ण शरणागतभावाने
प्रार्थना आहे…।। ८ ।।’

– ठाणे सेवाकेंद्रातील सर्व साधक (८.४.२०२१)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक