इंग्रजी आणि संस्कृत अक्षर यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
इंग्रजी अक्षराच्या तुलनेत संस्कृत (हिंदी, मराठी) अक्षराचा वायूमंडलावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !
‘भाषा’ हे संवादाचे, तसेच विचार आणि भावना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. भाषेतील विविध ध्वनींना व्यक्त करणार्या लिखित चिन्हांना ‘अक्षर’ म्हणतात. इंग्रजी आणि संस्कृत (हिंदी, मराठी) या भाषांतील अक्षरांमधून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा वायूमंडलावर काय परिणाम होतो, हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यासण्याच्या उद्देशाने इंग्रजी ‘A’ आणि संस्कृत (हिंदी, मराठी) भाषेतील ‘ए’ या अक्षरांच्या छायाचित्रांची ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी करण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
१. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती
१ अ. इंग्रजी अक्षरे : इंग्रजी, फ्रेंच आदी पाश्चात्त्य भाषांतील लिखाणासाठी ‘रोमन लिपी’ वापरतात. इंग्रजी भाषेच्या वर्णमालेत ‘A’, ‘B’, ‘C’ आदी २६ मुळाक्षरे आहेत.
१ आ. संस्कृत (हिंदी, मराठी) अक्षरे : संस्कृत (आणि संस्कृतोद्भव) मराठी, हिंदी यांसारख्या भारतीय भाषांतील लिखाणासाठी ‘देवनागरी लिपी’ वापरतात. संस्कृतमध्ये ६४, मराठी भाषेत ‘अ’, ‘आ’, ‘इ’ आदी ५२ मुळाक्षरे आहेत आणि हिंदी भाषेत ११ स्वर (अं, अः सोडून) + ३३ व्यंजने (क्ष, त्र आणि ज्ञ सोडून) = ४४ वर्ण, तर संत कबिरांच्या दोह्यानुसार ५२ आहेत.
‘पिप’ चाचणीसाठी इंग्रजी ‘A’ आणि संस्कृत (हिंदी, मराठी) भाषेतील ‘ए’ ही एकसमान उच्चार असणारी; पण भिन्न आकृतीने दर्शवली जाणारी अक्षरे निवडली आहेत.
वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘पिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घटकांची सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा असणे’, ‘चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता’, ‘प्रभावळीत दिसणार्या रंगांची माहिती’ इत्यादी नेहमीची सूत्रे https://www.sanatan.org/mr/PIP या सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील लिंकवर दिली आहेत.
२. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत इंग्रजी ‘A’ आणि संस्कृत (हिंदी, मराठी) भाषेतील ‘ए’ या अक्षरांची छायाचित्रे ठेवण्यापूर्वीच्या आणि नंतरच्या वातावरणाची घेतलेली ‘पिप’ छायाचित्रे निवडली आहेत. या दोन्ही अक्षरांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होतो, हे या चाचणीद्वारे समजले.
३. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन
पुढील सारणीत ‘मूलभूत नोंदी’च्या प्रभावळीतील (चाचणीतील घटक चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या वातावरणाच्या प्रभावळीतील) आणि चाचणीतील घटकांच्या प्रभावळीतील नकारात्मक आणि सकारात्मक स्पंदने दर्शवणार्या रंगांचे प्रमाण दिले आहे. पुढे दिलेल्या विवेचनात चाचणीतील घटकांच्या प्रभावळींची तुलना ‘मूलभूत नोंदी’च्या प्रभावळीशी केली आहे.
टीप – घटकाच्या केवळ बाह्य स्तरावरील नकारात्मक स्पंदने नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता
– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२९.९.२०१५)
३ अ. विवेचन
१. इंग्रजी अक्षर ‘A’ मधून नकारात्मक स्पंदने पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित झाली आहेत.
२. संस्कृत (हिंदी, मराठी) अक्षर ‘ए’ मधून सकारात्मक स्पंदने पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित झाली आहेत.
४. निष्कर्ष
वरील चाचणीतून लक्षात येते की,
अ. इंग्रजी अक्षर ‘A’ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणारे असल्याने व्यक्तीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक आहे.
आ. संस्कृत (हिंदी, मराठी) अक्षर ‘ए’ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणारे असल्याने व्यक्तीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे.
यामागील कारण पुढील सूत्रात दिले आहे.
५. संस्कृत (हिंदी, मराठी) भाषेतील अक्षराचे रूप आणि उच्चार सारखा असल्याने त्यात सकारात्मक (सात्त्विक) स्पंदने अधिक असणे
‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हे अध्यात्मातील तत्त्व आहे. यानुसार जेथे शब्द, म्हणजे उच्चार असतो, तेथे त्याचे रूपही असते, म्हणजे त्याचा आकार असतो. ‘ए’च्या उच्चाराचे, म्हणजे ‘शब्दा’चे जे रूप आहे, त्याचप्रमाणे संस्कृत भाषेत ‘ए’ लिहिला जातो; म्हणून संस्कृत (हिंदी, मराठी) अक्षर ‘ए’ मध्ये सकारात्मक (सात्त्विक) स्पंदने अधिक प्रमाणात आहेत. हेच सूत्र संस्कृतसह मराठी, हिंदी या भाषांतील (देवनागरी लिपीतील) सर्व अक्षरांनाही लागू होते.
इंग्रजी अक्षर ‘A’ चा उच्चार आणि रूप यांत विसंगती असल्याने त्यामध्ये नकारात्मक (तामसिक) स्पंदने अधिक प्रमाणात आहेत.
देवनागरी लिपीचे आध्यात्मिक स्तरावरील महत्त्व जाणल्यावर ऋषिमुनींनी देवनागरी लिपीसारख्या अत्यंत सात्त्विक लिपीची निर्मिती करून मानवावर अनंत उपकारच केले आहेत, याची जाणीव होते.’
(अधिक विवेचनासाठी वाचा : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘मराठी भाषेची सात्त्विकता स्पष्ट करणारे ज्ञान व सूक्ष्म-चित्रे’)
६. सर्व व्यवहार भारतीय भाषांतूनच करा !
‘विज्ञानाच्या कसोटीवर जे सिद्ध होते ते स्वीकारणार्या आधुनिक जगात देवनागरी लिपीची वैज्ञानिकदृष्ट्या असणारी उपयुक्तता सिद्ध होऊनही अद्याप ती सर्वत्र प्रचलित होऊ न शकणे, एवढेच नव्हे तर ‘भारतातही सर्व व्यवहार सात्त्विक भारतीय भाषांतून न होणे’, हे भारतीय राज्यकर्त्यांचेच अपयश नव्हे का ? ही स्थिती पालटण्यासाठी सर्व व्यवहार संस्कृत आणि संस्कृतोद्भव मराठी, हिंदी यांसारख्या भारतीय भाषांतच व्हायला हवेत !’
– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२९.९.२०१५)
ई-मेल : [email protected]
कोणतेही स्थूल उपकरण न वापरता अध्यात्मशास्त्राविषयी ज्ञान देणारे ऋषिमुनी विज्ञानापेक्षा श्रेष्ठ !‘प्राचीन ऋषिमुनींनी देवनागरीसारख्या अत्यंत सात्त्विक लिपीची निर्मिती केली. त्यांना ध्वनी आणि त्याच्याशी संबंधित रूप (आकृती) यांचे मिळालेले ज्ञान कोणत्याही स्थूल उपकरणामुळे नव्हे, तर साधनेने प्राप्त झाले होते. त्यांनी मिळवलेल्या अथांग ज्ञानातील केवळ अंशमात्र ज्ञानाची सत्यता ‘पिप’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे जाणता आली. यावरून ऋषिमुनींनी कोणतेही स्थूल उपकरण न वापरता साधनेमुळे सूक्ष्मातून जाणलेले किती योग्य आहे, तेच लक्षात येते !’ |