
‘हे हिंदु राष्ट्रदेवते, आजमितीला हिंदु, हिंदुत्व आणि हिंदु धर्म संपण्याच्या मार्गावर आहे. या स्थितीत आमचा रक्षणकर्ता, वाली तूच आहेस ! आता विलंब करू नकोस. आमचे प्राण गळ्याशी आलेले आहेत. ये, धावत – दौडत ये ! गर्जत ये ! जे तुला आडवे येतील, त्यांना लांघून ये ! झणकारत ये ! प्रचंड वादळी वार्याप्रमाणे दणकावत ये ! आम्ही सारे हिंदु बांधव डोळ्यांत प्राण आणून तुझी आतुरतेने वाट पहात आहोत ! डौलाने ये ! झणकारत ये ! हसत आणि शौर्याने ये ! आम्हा मरगळलेल्या हिंदूंमध्ये शौर्य, धैर्य आणि प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी गतीमान होऊन ये ! लवकरात लवकर ये !
तुला आम्हा सर्व हिंदु बांधवांचे कोटीशः नमस्कार !’
– (पू.) गुरुनाथ दाभोलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.