राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १९.७.२०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

टिपू सुलतानचे नाव द्यायला हा भारत नसून पाकिस्तान आहे का ? अशा देशद्रोह्यांना आजन्म कारागृहात टाका !

‘मुंबईतील गोवंडी येथील ‘एम्/पूर्व’ विभागातील प्रभाग क्र. १३६ मधील साहीनाका डम्पिंग रोड येथील उद्यानास क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव देण्याचा घाट समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी घातला आहे.’


एका पोलीस कर्मचार्‍याकडे एवढी मालमत्ता कशी आली, याचा पोलिसांनी आणि सरकारने विचार केला पाहिजे !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

‘हिंगोली (महाराष्ट्र) येथील पोलिसांच्या नवीन वसाहतीमध्ये रहाणारे पोलीस कर्मचारी रवि सावळे यांचे घर फोडून चोरट्यांनी दागिने आणि रोख रक्कम, असा एकूण ७५ लाख रुपयांचा माल पळवला.’


पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथील कर्मचारी भ्रष्टाचारी नसते, तर एव्हाना भ्रष्टाचार नष्ट झाला असता !

‘महाराष्ट्र राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या ६ मासांत ८ विभागांत ३९४ सापळे रचून ५४१ लाचखोरांवर कारवाई केली. यात महसूल आणि पोलीस या विभागांतील लाचखोरांवर सर्वाधिक कारवाई केली. एकूण कारवाईपैकी ४० टक्के कारवाई या २ विभागांतच झाली आहे.’


लाचखोरांवर वेळीच कठोर शिक्षा न होण्याचा गंभीर परिणाम ! लाचखोरीमुळे पोखरल्या गेलेल्या सरकारी यंत्रणा कधी सुधारणार ? लाचखोरांना फाशी दिल्यासच या प्रकाराला आळा बसेल !

‘महाराष्ट्र राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या ६ मासांत ८ विभागांत ३९४ सापळे रचून ५४१ लाचखोरांवर कारवाई केली. यात महसूल आणि पोलीस या विभागांतील लाचखोरांवर सर्वाधिक कारवाई केली. एकूण कारवाईपैकी ४० टक्के कारवाई या २ विभागांतच झाली आहे.’