(म्हणे) ‘समाज फादर स्टेन स्वामी यांचे ‘अमूल्य योगदान’ सदैव लक्षात ठेवील !’ – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची मुक्ताफळे

  • शहरी नक्षलवादी असलेल्या स्टॅन यांचा ‘हुतात्मा’ असा उल्लेख, क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्याशी तुलना !

  • श्रद्धांजली सभेत अन्य पाद्य्रांनी पायातील जोडे तसेच ठेवले; मात्र सोरेन यांनी स्टॅन स्वामी यांच्या सन्मानार्थ जोडे काढून ठेवले !

  • शहरी नक्षलवादी असलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटात सहभागी  असल्याचा आरोप असलेले फादर स्टॅन स्वामी यांचे कुठले ‘योगदान’ झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ‘अमूल्य’ वाटते ?, हे जनतेला कळले पाहिजे !
  • शहरी नक्षलवाद्याला ‘हुतात्मा’ ठरवणारी व्यक्ती भारतात ‘मुख्यमंत्री’ बनते ! अशांच्या राजवटीत जनतेला कधी कायद्याचे राज्य मिळू शकेल का ? सरकारने अशांचीही तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !
  • ख्रिस्त्यांचे उदात्तीकरण करण्याच्या नादात गुन्हेगारांचे समर्थन करणारे मुख्यमंत्री समाजद्रोहीच होत !
डावीकडून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि फादर स्टेन स्वामी

रांची (झारखंड) – समाज फादर स्टेन स्वामी यांचे ‘अमूल्य योगदान’ सदैव लक्षात ठेवील, अशी मुक्ताफळे झारखंडचे मुख्यमंत्री तथा झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी उधळली. स्टॅन स्वामी यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी १५ जुलै २०२१ या दिवशी येथील नामकुम बागेत एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सोरेन बोलत होते. या वेळी रांचीचे आर्चबिशप (चर्चमध्ये वरच्या श्रेणीत कार्यरत असलेल्या पाद्य्रांना बिशप म्हणतात, तर बिशपच्या वर कार्यरत असणार्‍यांना ‘आर्चबिशप’ म्हणतात.) थियोडोर मस्कारेनहास, साहायक बिशप टेलोस्फर बिलुंग यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. या वेळी उपस्थित असलेल्या अन्य पाद्य्रांनी पायातील जोडे तसेच ठेवले होते; परंतु मुख्यमंत्री सोरेन यांनी स्टॅन स्वामी यांच्या सन्मानार्थ जोडे काढून ठेवले होते. (ख्रिस्त्यांचा पराकोटीचा लाळघोटेपणा करणारे स्वाभिमानशून्य मुख्यमंत्री ! – संपादक) इतकचे नव्हे, तर सोरेन यांनी स्टॅन स्वामी यांचा ‘हुतात्मा’ असा उल्लेख करत त्यांची तुलना इंग्रजांच्या विरोधात लढलेले झारखंड येथील थोर क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्याशी केली.(हा क्रांतीकारक मुंडा यांचा अवमान होय. देशाच्या मुळावर उठलेल्या शहरी नक्षलवाद्यांची तुलना क्रांतीकारकांशी करणार्‍या मुख्यमंत्र्यांची बौद्धिक दिवाळखोरी ! – संपादक)स्वामी
सोरेन पुढे म्हणाले की, फादर स्टॅन स्वामी यांनी दलित, वंचित आणि आदिवासी यांच्यासाठी लढा दिला. यासाठी पुढील पिढ्या त्यांच्या जीवनातून ‘प्रेरणा’ घेतील. बलीदान देण्यात झारखंड कधी मागे राहिला नाही. फादर स्टॅन स्वामी हे त्यांच्या अमूल्य योगदानासाठी समाजाच्या लक्षात रहातील. अनेक युगांनंतर अशा व्यक्ती जन्माला येत असतात, ज्यांचे कर्तुत्व कधीही पुसले जाऊ शकत नाही.