|
मुंबई, १२ जुलै (वार्ता.) – समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना नाझिम सिद्दीकी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १३६ येथील गोवंडीमधील उद्यानाला क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव देण्याची शिफारस मुंबई महानगरपालिकेच्या बाजार आणि उद्यान समितीकडे केली आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बाजार आणि उद्यान समितीकडे नगरसेविका सिद्दीकी यांची मागणी मान्य करण्याची शिफारस केली आहे. (अशी शिफारस करणारे प्रशासन भारताचे कि पाकचे ? – संपादक) बाजार आणि उद्यान समितीच्या १५ जुलैला होणार्या मासिक बैठकीत हा विषय चर्चेला येणार आहे.
याविषयी नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी बाजार आणि उद्यान समितीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘टिपू सुलतान हे भारताचे क्रांतीसेनानी होते. त्यांनी ब्रिटिशांच्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या विरोधात युद्ध पुकारून भारताला इंग्रजांपासून मुक्त करण्याचा पहिला प्रयत्न केला. त्यांच्या या महान कार्याविषयीची माहिती चिरंतन रहावी, यासाठी गोवंडी, साकीनाका येथील उद्यानाला ‘टिपू सुलतान उद्यान’ असे नाव देण्यात यावे, अशी येथील नागरिकांची आणि माझीही आग्रहाची विनंती आहे.’ (असंख्य हिंदूंचे धर्मांतर करणार्या, शेकडोंची हत्या करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानने दक्षिण भारतातील सहस्रो मंदिरे पाडली. टिपूच्या अत्याचारी राजवटीत हिंदु स्त्रियांवर अमानुष अत्याचार करण्यात आले. अशा क्रूरकर्म्याचे नाव उद्यानाला देणे हिंदूंना मान्य आहे का ? – संपादक)