|
|
जम्मू – काश्मीरच्या बडगाम आणि श्रीनगर येथून दोघा शीख मुलींचे अपहरण करून त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील एका मुलीचा मुसलमान तरुणाशी बलपूर्वक विवाह करवून देण्यात आला आहे. या घटनांविषयी शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंह सिरसा आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीच्या पदाधिकार्यांनी जम्मू येथे आंदोलन करून उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेऊन योग्य कारवाई करण्याची मागणी केली.
The Sikh community has urged to pass stringent laws to prevent forced religious conversion https://t.co/u43hm1qGVK
— OpIndia.com (@OpIndia_com) June 27, 2021
बडगामच्या गुरुद्वारा प्रबंधक कमेटीचे अध्यक्ष सरदार संतपाल सिंह यांनी सांगितले की,
१. बडगाम येथील मुलगी मानसिक रुग्ण होती. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यात आले. हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण आहे. या मुलीला तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेले नाही.
२. पोलीस अधीक्षकांनी लेखी म्हटले होते की, न्यायालयात सुनावणी झाल्यावर तिला कुटुंबाकडे देण्यात येईल; मात्र न्यायालयाने मुसलमान तरुणाच्या बाजूने निकाल दिला आणि मुलीला त्याच्या कह्यात दिले.
३. न्यायालयात कोरोना नियमांचे कारण सांगत पोलिसांनी आम्हाला बाहेर बसवले; मात्र मुसलमान तरुणाच्या नातेवाइकांना आत जाऊ दिले. न्यायालयात आमच्या अनुपस्थितीत मुलीचा जबाब नोंदवला. तसेच मुलाच्या नातेवाइकांच्या जबाबाकडे लक्ष दिले.
४. न्यायालयाने मुलीचे नातेवाईक म्हणून आम्हाला बोलावलेच नाही. न्यायालयाने किमान १ आठवड्यासाठी तरी मुलीला आमच्याकडे सोपवायला हवे होते. त्यानंतर जर तिला वाटले असते, तर आम्ही मुसलमान तरुणाकडे तिला जाऊ दिले असते. या मुसलमानाचे आधीच २-३ विवाह झालेले आहेत. मुसलमान धर्मियांनी आमचे समर्थन करत साहाय्य केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.