सनातन संस्थेने प्रकाशित केलेला ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि : प.पू. दादाजी वैशंपायन’ हा ग्रंथ तिरुपती येथील श्री व्यंकटेश बालाजीच्या चरणी अर्पण !

श्री बालाजीचे भक्त श्री. पुरुषोत्तम राठी आणि शेवगावच्या श्रीदत्त देवस्थानचे सेवाभावी कार्यकर्ते श्री. जगन्नाथ गोसावी यांनी केला अर्पण !

ग्रंथ श्री तिरुपती बालाजीच्या चरणी अर्पण करतांना भक्त, १. श्री. जगन्नाथ गोसावी आणि २. श्री. पुरुषोत्तम राठी

तिरुपती (आंध्रप्रदेश) – सनातन संस्थेने प्रकाशित केलेला ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि : योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !’ हा ग्रंथ १९ जून या दिवशी भावपूर्ण वातावरणात येथील श्री व्यंकटेश बालाजीच्या चरणी अर्पण करण्यात आला. मुख्य मंदिराच्या बाजूला असलेल्या एका छोट्या मंदिरात हा सोहळा पार पडला. श्रीक्षेत्र वरुर, (ता. शेवगाव, जिल्हा नगर) येथील श्री व्यंकटेश बालाजीचे भक्त श्री. पुरुषोत्तम राठी आणि शेवगावच्या श्रीदत्त देवस्थानचे सेवाभावी कार्यकर्ते श्री. जगन्नाथ गोसावी यांनी हा ग्रंथ अर्पण केला. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले आणि योगतज्ञ प.पू. दादाजींची मनोभावे सेवा केलेले सनातनचे साधक श्री. अतुल पवार हे या ग्रंथाचे संकलक आहेत.

या वेळी तिरूमला येथील श्रीराम मंदिर मूळ मठाचे श्रीकृष्ण स्वामी, तसेच सर्वश्री प्रकाश डांगरे, अशोक अंबुरे, मनोज आहुजा, सुनील म्हस्के, दीपक मोरे आदी बालाजीभक्त उपस्थित होते. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या कृपाशीर्वादाने सर्वांनी धनदेवता श्री बालाजीच्या चरणी श्रद्धेने डोके टेकवत हुंडीत यथाशक्ती दान केले.

वैशिष्ट्य

या वेळी कुठलीही सुगंधित वस्तू किंवा द्रव्य नसतांना उपस्थित सर्वांना सुगंधाची अनुभूती आली. श्री. जगन्नाथ गोसावी यांना योगतज्ञ प.पू. दादाजी यांचे सुगंधाच्या माध्यमातून तेथे अस्तित्व जाणवले.

येथे प्रसिद्ध  करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक