…हिंदु राष्ट्रात हिंदूंवरील अन्याय आणि राष्ट्रापुढील सर्व समस्या संपतील !
समाजरक्षणासाठी…
- समलैंगिक विकृतीचे घटनात्मक संरक्षण काढण्यासाठी…
- विवाहबाह्य संबंधांचे घटनात्मक संरक्षण काढण्यासाठी…
- ‘अॅट्रॉसिटी’ कायद्याच्या अनुचित वापराचे घटनात्मक संरक्षण काढण्यासाठी…
- सुखासाठीच्या सर्व गोष्टी शिकवणारे आई-वडील धर्माचरणाचे धडे देऊ शकत नाहीत, त्यासाठी…
- शाळा आणि प्रशासन धर्माचरण शिकवत नाहीत, त्यासाठी…
- गुन्हेगारी आणि अनैतिकता यांनी परिसीमा गाठली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी…
- भ्रष्टाचार करून जनतेचे कुपोषण करणारे सर्वपक्षीय राजकारणी पालटण्यासाठी…
- भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होऊनही सत्तेची खुर्ची न सोडणारे सर्वपक्षीय राजकारणी पालटण्यासाठी…
- स्वतःच्या तुंबड्या भरून जनसामान्यांचे जगणे कठीण करणारे राजकारणी पालटण्यासाठी…
देशरक्षणासाठी…
- ‘टुकडे टुकडे गँग’ निरस्त करण्यासाठी…
- शाहिनबागसारखी आंदोलने होऊ न देण्यासाठी…
- काही ना काही निमित्त काढून साम्यवादी, निधर्मी आणि धर्मांध करत असलेल्या दंगली संपवण्यासाठी…
- घुसखोर मोकाट आणि देशाच्या सीमा असुरक्षित ही स्थिती पालटण्यासाठी…
- शत्रूराष्ट्राकडून चालू असलेल्या कूटयुद्धात प्रतिदिन सैनिकांचे हुतात्मा होणे थांबवण्यासाठी…
- नक्षलवाद आणि आतंकवाद यांचा कायमस्वरूपी निःपात करण्यासाठी…
- पाकिस्तानशी आरपारची लढाई करून त्याचा प्रश्न संपवण्यासाठी…
- चीनला मान वर करून बघण्याचे धाडसही होणार नाही, अशी स्थिती निर्माण करण्यासाठी…
- घुसखोरी कायमस्वरूपी रोखण्यासाठी… !
इतिहासाच्या रक्षणासाठी…
- …हिंदूंच्या स्वराज्यावर चालून आलेल्या जिहादी अफझलखानाचा वध करण्याचा प्रताप शिवछत्रपतींनी जिथे घडवला, त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी आज दुर्दैवाने अफझल्ल्याचे उदात्तीकरण केले जात आहे !
- …ज्या विशाळगडावर महाराज पोचल्यावर बाजीप्रभूंनी प्राण सोडले, त्या विशाळगडावर आज बहामनी सेनापती रेहान याच्या दर्ग्याचे प्रस्थ आणि सभोवताली गैरधंदे वाढून हिंदू तिथे नवस बोलायला जात आहेत !
अस्तित्वाच्या रक्षणासाठी !
- लॅण्ड जिहादला पूर्णतः आळा बसण्यासाठी…
- देशात ठिकठिकाणी निर्माण झालेल्या ‘छोट्या पाकिस्तान’मुळे होत असलेले हिंदूंचे स्थानांतर थांबवण्यासाठी…
- वर्ष २०६१ मध्ये हिंदू अल्पसंख्यांक होतील, अशी स्थिती टाळण्यासाठी…
माझ्या काश्मीरचे पुनःश्च नंदनवन करण्यासाठी…!
- प्रत्येक पीडित काश्मिरी बांधवाला न्याय मिळवून देण्यासाठी…
- सहस्रो बलात्कारित काश्मिरी स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी…
- जे लक्षावधी काश्मिरी विस्थापित झाल्याने त्यांचा वंशविच्छेद झाला, त्या सार्यांसाठी…
- नृशंस हत्याकांडाने उद्ध्वस्त झालेल्या लाखो काश्मिरी कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी…
लव्ह जिहाद संपवण्यासाठी…!
‘विकिपीडिया’ या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ऑनलाईन माहितीकोशावर ‘लव्ह जिहाद हा हिंदूंनी निर्माण केलेला कट (षड्यंत्र किंवा वादंग) आहे’, अशी माहिती दिलीआहे ! लव्ह जिहादचे अनेक ग्रंथ निघतील एवढे पुरावे उपलब्ध असतांना एवढा धादांत खोटेपणा कोट्यवधी हिंदू खपवून घेत आहेत. निधर्मीपणा दाखवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनीही लव्ह जिहादसारख्या हिंदूंचा वंशविच्छेद करणार्या प्रश्नाविषयी हिंदुविरोधी असंवेदनशील वक्तव्ये केली, ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद गोष्ट आहे. सध्या उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांत लव्ह जिहादविरोधी कायदा आहे. कर्नाटकमध्येही यावर कायदा होणार आहे. ज्या अर्थी कायदा झाला, त्या अर्थी ‘लव्ह जिहाद नाही’, असे म्हणणार्यांना ही मोठी चपराक आहे ! हिंदु जनजागृती समितीने तिच्या संकेतस्थळावर लव्ह जिहादविरोधी कायदा होण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरून सरकारला पाठवण्याची सोय उपलब्ध करून याविरोधात मोहीम राबवली होती.
हिंदूंना धाकधूक हीच आहे की, गोवंश हत्याबंदी कायद्याप्रमाणे याची अवस्था होऊ नये ! या कायद्याचीही कडक कार्यवाही होऊन, तसेच आरोपींना तत्परतेने कडक शासन होऊन हा लव्ह जिहाद बंद झाला पाहिजे.
हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी…!
सत्य इतिहास दाबला जाऊन धादांत खोटा इतिहास जगासमोर येत आहे. त्यामुळे नवीन पिढीला हे इस्लामी राज्यकर्त्यांचे राष्ट्र वाटून त्यांचे खच्चीकरण झाले आहे.
एन्.सी.ई.आर्.टी.सारख्या केंद्रीय पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप आदींना ४ ओळी दिल्या गेल्या आहेत; उलट इस्लामी राज्यकर्त्यांचा पानेच्या पाने भरून इतिहास शिकवला जात आहे. यामध्ये हिंदूंचा आणि प्राचीन भारताचा गौरवशाली इतिहास जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आला. प्रत्यक्षात दीड सहस्र वर्षे भारतभर पसरलेल्या हिंदु राज्यांनी इस्लामी आक्रमकांशी अत्यंत वीरतापूर्वक लढाया केल्या. त्यामुळे बलाढ्य आसुरी इस्लामी आक्रमकांना पूर्ण भारतभर सत्ता कधीच मिळवता आली नाही. हा सत्य इतिहास पुढे न आणता ‘इस्लामी राजवट भारतभर होती’, असे भासवण्याचा प्रयत्न झाला. भारतीय कलेवरील इस्लामी वर्चस्व पुढे आणले गेले. प्रत्यक्षात त्याचे मूळ भारतीय कलांमध्ये आहे, हा इतिहास जाणीवपूर्वक दडवला गेला. त्यामुळे सनातन हिंदु धर्म, संस्कृती, कला, शूर आणि नीतीमान हिंदु राजे यांविषयी आज हिंदूंना माहिती नाही अन् त्यामुळे त्यांना त्याचा अभिमान नाही.
गोवंशियांचे हत्यासत्र थांबवण्यासाठी…!
भारतातून २५ सहस्र गायी बांगलादेशांतील पशूवधगृहात पाठवल्या जातात. ५० सहस्र गायींची कत्तल केली जाते. देशात प्रतिमास दोन-तीन लाख इतक्या गोवंशियांची कत्तल होत असून केरळमध्ये २५ सहस्र गोवंशियांची कत्तल प्रतिमास होते. आज भारत मांस निर्यात करणारा प्रमुख देश बनला असून गोशाळांपेक्षा पशूवधगृहांना जास्त अनुदान दिले जाते. स्वातंत्र्याच्या वेळी १२८ प्रजाती असलेले ९० कोटी गोधन आता १ कोटीवर आले आहे. शासकीय अभ्यासातील आकडेवारीनुसार गेल्या १० वर्षांत २ लाख ५६ सहस्र शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. याच अभ्यासामध्ये जे शेतकरी भारतीय गाय पाळत होते, त्यांनी आत्महत्या केलेल्या नाहीत, असाही निष्कर्ष आहे. आपल्याकडे चहाला ‘राष्ट्रीय पेय’ घोषित केले जाते; परंतु दुधाला केले जात नाही; कारण आपल्याला गायींचे रक्षण करावे लागेल. गायींचा अनन्यसाधारण उपयोग आणि माहात्म्य असूनही नतद्रष्ट माणसे जिभेचे चोचले पुरवणे अन् आर्थिक लाभ मिळवणे यांसाठी गायीला लक्ष्य करतात. गायीसाठी स्वत:चे प्राण सिंहाला देणार्या राजा दिलीपच्या भारतभूमीचे दुर्दैव नव्हे का ? जिवावर उदार होऊन गोरक्षक हे गोमाता आणि गोमांस यांची तस्करी पकडून देतात. त्यानंतर आरोपी मोकाट सुटतात. गोवंश हत्याबंदीचा कायदा असूनही त्याचा उपयोग गोहत्या थांबवण्यासाठी होत नाही.
हलाल प्रमाणपत्राचा आर्थिक जिहाद रोखण्यासाठी…!
इस्लामी देशांत उत्पादने विकण्यासाठी हलाल सर्टिफिकेट (प्रमाणपत्र) घेणे अनिवार्य करण्यात आले. हे प्रमाणपत्र घेतांना काही सहस्र रुपये द्यायचे आणि प्रतिवर्षी त्याचे नूतनीकरण करायचे. हे पैसे आतंकवादी संघटनांना पुरवले जातात. पतंजलीपासून हल्दीरामपर्यंतच्या अनेक शाकाहारी उत्पादनांनाही इस्लामिक देशांत त्यांच्या आस्थापनांचे उत्पादन विकले जाण्यासाठी हे प्रमाणपत्र घेण्यास बाध्य केले गेले. अशा प्रकारे हिंदूंच्या आस्थापनांकडून अनावश्यक हलाल प्रमाणपत्रासाठी पैसा लुटून तो हिंदूंच्या विरोधातच वापरला जात आहे. इतके हे भयानक आहे. धार्मिकतेच्या आधारावर असलेली ही इस्लामी अर्थव्यवस्था (‘हलाल इकॉनॉमी’) अशा प्रकारे अतिशय चातुर्याने निधर्मी भारतात लागू करण्यात आली असून हिंदू आणि भारतीय यांना त्यांनी मूर्ख बनवले आहे. रेल्वे, एअर इंडिया अशा सरकारी आस्थापनांतही हलाल अनिवार्य करण्यात आले, हे दुःखदायक आहे. देशात केवळ १५ टक्के असणार्या अल्पसंख्य मुसलमान समाजाला इस्लामनुसार संमत हलाल मांस खायचे आहे; म्हणून उर्वरित ८५ टक्के जनतेवरही ते लादण्यात येऊ लागले. आता तर खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था, मॉल यांसाठीही ते चालू झाले आहे.
(दैनिक ‘सनातन प्रभात’)