उपमुख्यमंत्री अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यात मराठा आरक्षणाविषयी चर्चा
कोल्हापूर – जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे १४ जून या दिवशी कोल्हापूर दौर्यावर आले होेते. या वेळी येथील न्यू पॅलेस येथे त्यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली, तसेच त्या दोघांमध्ये १ घंटा चर्चाही झाली.
या चर्चेनंतर श्रीमंत शाहू छत्रपती प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व सूत्रांवर चर्चा झाली. याविषयी अजित पवार स्वत:च माहिती देतील. मराठा समाजासाठी जे काही करता येईल ते करण्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.