सातारा जिल्ह्यातील कोरोनातून बरे झालेल्या ५ सहस्र १०७ रुग्णांना घरी सोडले

जिल्ह्यात प्रथमच एवढ्या अधिक संख्येने ‘डिस्चार्ज’ !

सातारा, ४ जून (वार्ता.) – जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोविड रुग्णालये आदींमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या ५ सहस्र १०७ रुग्णांना २ जून या दिवशी सायंकाळपर्यंत घरी सोडण्यात आले आहे. कोरोना काळात प्रथमच एवढ्या अधिक प्रमाणात रुग्णांना‘डिस्चार्ज’ दिल्याची घटना घडली आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २ जूनच्या रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण १ लाख ६९ सहस्र ३१४ रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते. त्यांपैकी १ लाख ४८ सहस्र ५२ रुग्णांना बरे करून घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत ३ सहस्र ७३० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये १७ सहस्र ५२९ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ८ लाख १० सहस्र ४४५ नागरिकांचे नाक आणि घशातील नमुने घेण्यात आले आहेत.