भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

आपत्काळातील संजीवनी औषधी वनस्पती !

संत-महात्मे यांच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू आहे. या काळात डॉक्टर, वैद्य, पेठेतील (बाजारातील) औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. अशा वेळी आपण लागवड केलेल्या औषधी वनस्पतीच उपयोगी पडतील; म्हणून आतापासूनच आपण त्यांच्या लागवडीकडे लक्ष द्यायला हवे. या लेखामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीची आवश्यकता, त्यांच्या लागवडीमुळे होणारे लाभ, तसेच अत्यल्प श्रमात लावता येण्याजोग्या आणि चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती, यांविषयीची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

भाग ५ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/483100.html

भाग ६

८. मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी रोपे बनवण्यास आवश्यक असलेली रोपवाटिका

८ अ. रोपवाटिकेचे महत्त्व : ‘औषधी वनस्पतींच्या लागवडीकरता पूर्ण वाढीची रोपे सिद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे असते. लागवडीसाठीची रोपे परिपक्व आणि निरोगी असणे आवश्यक असते. लागवडीच्या अनुषंगाने माती, पाणी, तापमान, हवामान, आर्द्रता आणि रोपांची काळजी या गोष्टी साध्या वाटत असल्या, तरी रोपांपासून मिळणारे उत्पन्न हे या गोष्टींवरच अवलंबून असते. रोपवाटिकेत बनवलेल्या रोपांपासून या गोष्टींची पूर्तता होते आणि परिणामी पीक चांगले येते. मोठ्या प्रमाणात करण्याच्या औषधी वनस्पतींच्या लागवडीमध्ये रोपवाटिकेला फार महत्त्व आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी, तसेच त्यासाठीची रोपवाटिका बनवण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते.

८ आ. भूमीची निवड : औषधी वनस्पतींची रोपवाटिका बनवतांना तिच्यासाठी निवडलेले क्षेत्र रस्त्याच्या लगत असावे. त्यामुळे वाहतूक आणि देवाण-घेवाण सुलभ होईल. रोपवाटिकेसाठी बारमाही पुरेशा पाण्याचा पुरवठा असणे अत्यंत आवश्यक असते. रोपवाटिकेभोवती कुंपण केलेले असणे, तसेच निवडलेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा उत्तम रीतीने होणे आवश्यक असते.

८ इ. कुंपण : रोपवाटिकेचे संरक्षण करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी तारेचे, दगडाचे किंवा लाकडाचे कुंपण करावे.’

८ ई. बीज संस्करण : ‘पुष्कळ वनस्पतींच्या बियांची सुप्तावस्था मोडण्यासाठी बीजसंस्करण करणे आवश्यक असते. बीज संस्करणासाठी रोपवाटिकेत अल्प व्ययाच्या पद्धती वापरता येतात. यात बियाणे गरम किंवा कोमट पाण्यात बुडवणे, चोळणे, घासणे, आपटणे, शेणात ठेवणे इत्यादी पद्धती मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.

पुढील सारणीमध्ये काही औषधी वनस्पतींचे बियाणे मिळण्याचा काळ, त्या बियांवर कोणते संस्कार करावेत ? तसेच बी किती दिवसांत उगवून येते ? याची माहिती दिली आहे.

(क्रमशः)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’)

औषधी वनस्पतींची लागवड साधना म्हणून करण्याचे महत्त्व

माणसातील गुणदोषांसाठी जसे आजूबाजूचे वातावरणही एक कारण असते, तसेच वनस्पतींच्या संदर्भातही आहे. औषधी वनस्पतींच्या भोवतालचे वातावरण जेवढे सात्त्विक असेल, तेवढ्या त्या अधिक सात्त्विक बनतात. जेवढा सत्त्वगुण अधिक, तेवढेच वनस्पतींमधील औषधी गुणही वाढतात. साधनेमुळे सत्त्वगुण वाढतो. औषधी वनस्पतींची लागवड निवळ अर्थार्जनाचे साधन म्हणून नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठीची साधना म्हणून केल्यास वनौषधी सात्त्विक होण्यास साहाय्य होते.

समाजहितासाठी मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करणे, ही समष्टी साधनाच !

ज्या व्यक्तींकडे मध्यम (३ – ४ एकर) किंवा मोठ्या प्रमाणात लागवड करण्यायोग्य भूमी आहे, अशा व्यक्तींनी केवळ स्वतःच्या परिवारापुरताच विचार न करता समाजबांधवांचा विचार करून मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करावी. या लागवडीमुळे अनेकांना आयुर्वेदीय औषधे उपलब्ध होऊन त्यांचे आरोग्यरक्षण होईल. या निःस्वार्थी समाजसेवेच्या माध्यमातून अशा व्यक्तींची समष्टी साधना होईल !

आपत्काळाच्या दृष्टीने वनौषधींच्या लागवडीचे महत्त्व दर्शवणारी ही लेखमाला साधक आणि वाचक यांनी संग्रही ठेवावी.

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी

SanatanShop.com

संपर्क :  ९३२२३ १५३१७