पंतप्रधान आरोग्य योजनेविषयी आलेला चांगला अनुभव !

माझे यजमान श्री. गोपाळ माईणकर यांना ऑगस्ट २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता. ते १३ दिवस रुग्णालयामध्ये होते. ऑक्सिजनची पातळी न्यून झाली होती. ओळखीच्या आधुनिक वैद्यांनी आम्हाला पंतप्रधान आरोग्य योजनेविषयी सांगितले. त्या योजनेमध्ये कोरोना झालेल्या आणि रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णाला औषधोपचाराच्या देयकामध्ये भरघोस कपात मिळत होती. त्याला पूर्व अट कोरोना होणे एवढीच होती. उत्पन्न वगैरे अन्य कोणतीही अट नव्हती. आम्हाला वाटले होते की, देयक पुष्कळ येईल; पण प्रत्यक्षात या योजनेमुळे पुष्कळ अल्प देयक भरावे लागले. – सौ. स्मिता माईणकर, सांगली

कोरोनाच्या काळात आलेले चांगले अनुभव त्वरित कळवा !

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : [email protected]