पणजी – राज्यशासनाने कोरोना महामारीमुळे शासकीय कर्मचार्यांनी प्रतिदिन कार्यालयात निम्म्या क्षमतेने उपस्थिती लावण्याची अधिसूचना मागे घेतली आहे. यामुळे १ जूनपासून शासकीय कर्मचारी पूर्णसंख्येने कार्यालयात उपस्थिती लावणार आहेत. हा शासनाचा आदेश सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, स्वायत्त संस्था आणि सरकारी अनुदानित संस्था यांना लागू होणार आहे. राज्यशासनाने ४५ वर्षांवरील सर्व सरकारी कर्मचार्यांना स्वत:हून कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले आहे, तसेच शासनाने आतापर्यंत किती शासकीय कर्मचार्यांनी कोरोनाची लस घेतली आहे, याविषयी माहिती मागवली आहे.
माहिती आयुक्तांनी जून मासातील माहिती अधिकाराखालील प्रकरणांवरील सुनावण्या जुलै मासात ढकलल्या
कोरोना महामारीमुळे माहिती आयुक्तांनी राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त यांच्यासमोरील माहिती अधिकाराखालील (आर्.टी.आय्.) प्रकरणांवरील जून २०२१ मधील सुनावण्या पुढे जुलै मासात ढकलल्या आहेत. या प्रकरणांवर जुलै २०२१ मध्ये सुनावण्या होणार आहेत.