सिंधुदुर्ग – खासगी ‘सिटीस्कॅन सेंटर’मध्ये ‘एच.आर्.सी.टी.’ चाचणी करण्यासाठी जनतेची लूट केली जात आहे. या तपासणीसाठी ५ सहस्र ते ७ सहस्र रुपयांपर्यंत दर आकारले जात आहेत. त्यामुळे संबंधित केंद्राची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. गेले अनेक दिवस जिल्ह्यात हे प्रकार होत असून पुढील ४ दिवसांत यावर कारवाई न झाल्यास मनसे कायदा हातात घेईल, अशी चेतावणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे केली आहे.