परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेला भावसोहळा पहात असतांना बिहार राज्यातील धर्मप्रेमींना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. डॉ. राजीव कुमार सिन्हा, मोतिहारी, पूर्वी चंपारण, बिहार.

१ अ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांकडून सोनेरी आणि पांढर्‍या रंगांचे किरण प्रक्षेपित होत आहेत’, असे दिसणे : भावसोहळ्याच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी पितांबर परिधान केले असून सुवर्णालंकार घातले आहेत. त्यांच्याकडून सोनेरी आणि पांढर्‍या रंगांचे किरण प्रक्षेपित होत असून ते माझ्यात समवेत आहेत’. असे मला दिसले.

२. श्रीमती रंभा कुमारी सिन्हा, मोतिहारी, पूर्वी चंपारण, बिहार.

२ अ. स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया शिकण्यासाठी उत्सुक असणे आणि नियमित नामजप करणे : डॉ. राजीव कुमार सिन्हा यांच्या पत्नी सौ. रंभा कुमारी सिन्हा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार नियमित मंत्रजप आणि नामजप करतात. भावसोहळा पाहिल्यानंतर त्यांना साधकाने भ्रमणभाष करून विचारले, ‘‘तुम्हाला काय शिकायला मिळाले ?’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘साधना करतांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी स्वतःला शिक्षा करणे अत्यंत आवश्यक आहे.’’ त्यांनी स्वभावदोषांची सूची आणि स्वयंसूचना सिद्ध करण्याची पद्धत असलेल्या लिखाणाची मागणी केली. त्यांनी ‘मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची पद्धत शिकवावी’, असेही सांगितले.

३. श्री. कृष्ण कुमार, सासाराम, बिहार

३ अ. परात्पर गुुरुदेवांचे त्यांच्या गुरूंविषयीचे बोलणे ऐकून समर्पित होऊन गुरुसेवा करण्याची प्रेरणा मिळणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जीवन परिचय ऐकून सर्व लोकांनी त्यांच्याविषयी अनुभव सांगितले. मला ते ऐकून पुष्कळ चांगले वाटले. परात्पर गुुरुदेवांनी त्यांच्या गुरूंविषयी जे सांगितले, ते ऐकून मला पुष्कळ आनंद झाला. त्यांनी त्यांच्या गुरूंची सेवा जशी तत्परतेने केली, त्यातून मला प्रेरणा मिळाली की, आपल्यालाही गुरूंप्रती असेच समर्पित होऊन साधना करायची आहे.’

३ आ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांप्रमाणे प्रत्येक कार्य तत्परतेने आणि उत्तम प्रकारे करायला हवे’, असे वाटणे : परात्पर गुरु डॉक्टरांच्या ज्येेष्ठ बंधूंनी सांगितले, ‘‘प.पू. डॉक्टर लहानपणापासूनच प्रत्येक कार्य तत्परतेने आणि उत्तम करण्याचा प्रयत्न करतात.’’ तेव्हा मला वाटले, ‘आम्हीही अशीच प्रेरणा घेऊन प्रत्येक कार्य उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.’

३ इ. ‘साधकांना मोक्षाकडे घेऊन जावे’, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना होणे : भावसोहळा बघतांना ‘जणू आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांच्या समोर असून ते आमच्याकडे बघत आहेत आणि ‘त्यांनी आम्हालाही मोक्षाला न्यावे’, असे मला वाटले. त्या वेळी ‘हे गुरुदेवा, आपणच आमच्याकडून सर्वकाही करवून घ्यावे. आता आम्हाला काहीच समजत नाही. आपणच सर्व काही समजावून शिकवावे’, अशी माझ्याकडून प्रार्थना झाली.

३ ई. ‘मनातील सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळाली’, असे वाटून आनंद होणे : भावसोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्व संतांकडून तेजोमय प्रकाश येत असल्याचा मला अनुभव आला. ‘परात्पर गुरु डॉक्टर आमच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठीच आम्हाला ही संधी देत आहेत. आता माझ्या मनातील सर्व प्रश्‍न संपले’, असे मला वाटत होते. मनातील अनेक शंकांचे निरसन झाल्याने मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘अशा महान परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी स्थान मिळालेे’, याविषयी मला कृतज्ञता वाटली. मी यापूर्वी रामनाथी आश्रमात आलो असतांना आलेल्या अनुभूतींचे मला स्मरण झाले आणि ‘मी आश्रमातच असून हा सोहळा पहात आहे’, अशी अनुभूती येऊन आनंद झाला.’

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक