सावंतवाडी तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या हानीचे पंचनामे लवकरच पूर्ण होणार ! – आमदार दीपक केसरकर, शिवसेना

सावंतवाडी – तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या हानीचे पंचनामे करण्याचे काम चालू असून येत्या ४ दिवसांत पूर्ण होतील, अशी माहिती शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी ‘झूम अ‍ॅप’द्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

या वेळी आमदार केसरकर म्हणाले, ‘‘या वादळात तालुक्यातील ४१४ घरांची हानी झाली असून ४ घरे पूर्णत: जमीनदोस्त झाली आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे. तालुक्यात सर्वाधिक हानी झाडे पडल्यामुळे वीज वितरण आस्थापनाची झाली आहे. वीज नसल्यामुळे लोकांचे पुष्कळ हाल झाले आहेत. सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यांतील काही भागांत अजूनही वीज नाही. तेथे युद्धपातळीवर काम चालू असून येत्या एक-दोन दिवसांत ते पूर्ण होईल. हानीभरपाई तात्काळ मिळावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.’’