(म्हणे) ‘पॅलेस्टाईन आणि काश्मीर स्वतंत्र करण्यासाठी अणूबॉम्ब टाका !’ – पाकिस्तानी खासदाराची दर्पोक्ती

पाकिस्तानच्या डोक्यावरील जिहादचे भूत पहाता आज ना उद्या तो भारतावर आणूबॉम्ब टाकायला मागे-पुढे पहाणार नाही, हे लक्षात घेऊन भारताने पाकला वेळीच त्याच्याकडे असलेल्या अणूबॉम्बसह नष्ट करणेच राष्ट्रहिताचे ठरेल !

मौलाना चित्राली

इस्लामाबाद – पॅलेस्टाईन आणि काश्मीर स्वतंत्र करण्यासाठी पाक सरकारने थेट अणूबॉम्ब टाकावा, अशी दर्पोक्ती पाकिस्तामधील खासदार मौलाना चित्राली यांनी पाकिस्तानी संसदेत केली. चित्राली पुढे म्हणाले, ‘‘आम्ही अणूबॉम्ब काय संग्रहालयात ठेवण्यासाठी सिद्ध केले आहेत ? जर आपण पॅलेस्टाईन आणि काश्मीर स्वतंत्र करू शकत नाही, तर आपल्याला क्षेपणास्त्रे, अणूबॉम्ब आणि सैन्य यांची काहीच आवश्यकता नाही.’’

पाकचे परराष्ट्रमंत्री तुर्कस्तान दौर्‍यावर !

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तुर्कस्तानात जाऊन तेथील राष्ट्रपती रेसेप तैय्यप यांची भेट घेतली. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाच्या बहाणा करून काश्मीरसाठी जगभरातील मुसलमान राष्ट्रांची आघाडी बनवण्याची पाकची भारतविरोधी योजना आहे.

इस्रायलविरुद्ध ५७ मुसलमान राष्ट्रे एकत्र आणण्यासाठी १७ मे या दिवशी ‘ओआयसी’ या इस्लामी राष्ट्रांच्या संघटनेची बैठक बोलावण्यात आली होती. हे देश इस्रायलविरुद्ध एकत्र येण्याऐवजी आपापसांतच भिडले, असे सांगण्यात आले.