मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होणार ! – दीपक शिंदे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

कोल्हापूर – मराठा आरक्षणाच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्ल्याने आता आरक्षण मिळवण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल, अशी ग्वाही भाजपचे मा. शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, मराठा समाजास आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकताच नसल्याने आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, हे सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र वाचल्यावर उघड होते. राज्यातील मागासवर्गीय आयोगाचा कालावधी संपल्यानंतर नवा आयोग स्थापन करण्यातही महाविकास आघाडी सरकार चालढकल करत असून त्यावरूनच आरक्षणाच्या प्रश्‍नावर सरकारची नकारात्मक मानसिकता स्पष्ट होत आहे.