सिंधुदुर्ग जिल्ह्याला साहाय्य केल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका केल्याचा आरोप

सावंतवाडी – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑक्सिजन सिलिंडर देऊन साहाय्य केले. त्यामुळे गोव्याचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे दिगंबर कामत यांनी सावंत यांच्यावर टीका केली आहे. ही टीका निषेधार्ह आहे, असे सांगत सावंतवाडी भाजपच्या वतीने नगराध्यक्ष संजू परब आणि भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी १० मे या दिवशी दिगंबर कामत यांच्या या कृत्याचा निषेध केला आहे.
जिल्ह्याला ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता असल्याने माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे सिलिंडर देण्याची विनंती केली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑक्सिजन सिलिंडर दिले होते; परंतु गोवा राज्य काँग्रेसकडून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप करत टीका केली जात आहे. या कठीण काळात शत्रूराष्ट्र देखील साहाय्याचा हात पुढे करत असतांना गोव्यातील विरोधी पक्षनेते कामत यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यावर टीका करणे चुकीचे आहे, असे मत नगराध्यक्ष संजू परब आणि भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील वेंगुर्ला, दोडामार्ग, कुडाळ आणि कणकवली येथेही भाजपच्या कार्यकर्त्यांनी, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनीही कामत यांचा निषेध केला आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !
कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल