ग्रंथप्रदर्शनाची सेवा करतांना तेथील लोकांनी ‘‘तुम्ही चांगले कार्य करत आहात’’, असे सांगून प्रेमाने विचारपूस करणे आणि आपल्याच सनातन धर्माचा प्रसार करत आहात’’, असा प्रतिसाद देणे

कु. पूनम चौधरी
कु. पूनम चौधरी

‘मला गुरुदेवांची पुष्कळ आठवण येऊन रडायला येत होते. काल आम्ही ग्रंथप्रदर्शनाची सेवा करत असतांना आम्हाला सर्वजण ‘‘तुम्ही करत असलेलेे कार्य केवढे चांगले आहे. तुम्ही काही खाल्ले आहे का ?’’, अशी विचारपूस करत होते. तेथील स्थानिक लोक आणि पोलीस आम्हाला साहाय्य करत होते. त्यांनी साहाय्य केले; म्हणून आम्ही कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपण आपल्याच सनातन धर्माचा प्रसार करत आहोत.’’ त्यांना धर्मप्रसाराचे कार्य करतांना पुष्कळ चांगले वाटत होते. त्या वेळी ‘गुरुदेवच प्रत्येक जिवाच्या माध्यमातून कसे साहाय्याला येतात’, हे अनुभवता येत होते. सद्गुरुकाका (सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे), गुरुदेवांना अपेक्षित असे करण्यामध्ये मी पुष्कळ न्यून पडत आहे. त्यासाठी मी आपल्या गंगेसमान पवित्र श्रीचरणी क्षमायाचना करते.’

– कु. पूनम चौधरी, देहली (१६.३.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक