‘परात्पर गुरु डॉ. आठवले हेच प्रत्यक्ष परब्रह्म आहेत’, याची सद्गुरु सिरियाक वाले यांनी घेतलेली अनुभूती

एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले यांचा आज चैत्र कृष्ण पक्ष दशमी (६ मे २०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सद्गुरु सिरियाक वाले यांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे देत आहोत.

सद्गुरु सिरियाक वाले

सद्गुरु सिरियाक वाले यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !


नामजप करतांना परात्पर गुरु डॉक्टर पहुडलेल्या स्थितीत  दिसून त्यांच्या देहातून एकापाठोपाठ एक ३ देवता बाहेर आल्याचे दिसणे आणि ‘परात्पर गुरु सर्वत्र असून ते परब्रह्म आहेत’, असे जाणवणे

‘एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने ‘ऑनलाईन’ ‘नामजप सत्रे (ग्रुप चँटिंग सेशन्स)’ घेतली जातात. एका सत्राच्या वेळी मला परात्पर गुरु डॉ. आठवले एका पलंगावर पहुडलेले दिसले. त्यांनी हातात आभूषणे आणि डोक्यावर मुकुट परिधान केला होता. ते गाढ निद्रेत होते आणि एका क्षणी मधेच त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या देहातून एकापाठोपाठ एक ३ देवता बाहेर आल्या. त्या तीन प्रमुख देवता होत्या. परात्पर गुरु डॉक्टर पहुडलेल्या स्थितीतच होते आणि त्यांनी डोळे उघडेच ठेवले होते. त्यांच्यात तीन देवता होत्या, ज्या त्यांच्याशी एकरूप झाल्या होत्या. हे दृश्य पाहून मला आतून पुष्कळ शांत वाटत होते. ‘परात्पर गुरु सर्वत्र असून ते परब्रह्म आहेत’, असे मला जाणवले.’

– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (२५.२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक