कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांना होतोय नवीन आजाराचा त्रास !

पुणे – संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकोरोमायकॉसिस या बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत आहेत. रोग प्रतिकारशक्ती अल्प झाल्यामुळे रुग्णांना हा संसर्ग होत आहे, मात्र वेळेत उपचार घेतल्यास या आजारातून बाहेर पडता येत असल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले. कोरोना झालेल्या व्यक्तीच्या उपचारादरम्यान वापरल्या जाणार्‍या स्टेरॉईडमुळे रोगप्रतिकारक शक्ती अल्प होते, तसेच मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची शक्यता वाढत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे.