रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या दोघांना सांगलीत अटक !

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍यांना लवकर कठोर शिक्षा दिल्यास अशा घटनांना आळा बसेल !


सांगली, २५ एप्रिल – रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे सुमित हुपरीकर आणि दाविद वाघमारे या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. सुमित हुपरीकर हा मिरज येथील शासकीय रुग्णालयात परिचारक म्हणून काम करतो, तर दाविद वाघमारे हा खासगी लॅब टेक्निशीयन आहे. या दोघांनी २ इंजेक्शन चोरून ती प्रत्येकी ३० सहस्र रुपयांना एक अशी विकली, अशी स्वीकृती दिली आहे.