सांगली –जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.आजपर्यंत जिल्ह्यात ८ सहस्र रुग्ण असून यात प्रतिदिन ८०० ते ९०० रुग्णांची भर पडत आहे.जिल्ह्यात आज घडीला ६० कोरोना उपचार केंद्र असून त्यांना प्रतिदिन ३८ टन इतका ऑक्सिजन लागत असून ही मागणी लवकरच ४० टन इतकी होईल.सध्या याचा पुरवठा पुणे,कर्नाटक,कोल्हापूर,तळोजा येथून होत असूनही तोही अत्यल्प होतो,त्यामुळे उपचारासाठी रुग्णांना आक्सिजन पुरवतांना कसरत करावी लागते.या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी आक्सिजन निर्मिती केंद्र उभारण्यात येणार आहे.
१० ते १२ दिवसांत याचे काम पूर्ण केले जाणार असून यासाठी पालकमंत्री जयंत पाटील,सहकारमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी पुढाकार घेतला आहे.जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी याविषयी सविस्तर प्रस्ताव सिद्ध केला आहे.