सोलापूर, २० एप्रिल (वार्ता.) – कोरनाचा संसर्ग वाढल्यामुळे रुग्णालय उपलब्ध होत नसल्याने महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर उभे करण्यात आले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून आणखी कोविड केअर सेंटर उपलब्ध करण्यात यावे यासाठी महापौर श्रीकांचना यन्नम् यांच्या समवेत सभागृहनेते श्रीनिवास करली, आयुक्त पी. शिवशंकर यांसह येथील सिद्धेश्वर साखर कारखाना येथील काडादी मंगल कार्यालय येथे कोविड केअर सेंटर सिद्ध करण्यासाठी कह्यात घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मंगल कार्यालयाची पहाणी करण्यात आली. या ठिकाणी १४० खाटांचे कोविड केअर सेंटर सिद्ध करण्यात येणार आहे.
या वेळी महापौर श्रीकांचना यन्नम् यांच्या समवेत महापालिकेतील सर्व पदाधिकारी, आयुक्त यांनी जुळे सोलापूर येथील म्हाडा येथील विलगीकरण कक्षाला भेट दिली, तसेच त्या ठिकाणी कोरोना रुग्णांना दिल्या जाणार्या सुविधांविषयी माहिती घेतली. या वेळी महापौर श्रीकांचना यन्नम् यांनी कोरोना संदर्भातील विविध उपाययोजना महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहेत, असे सांगितले.