कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष ! – डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी

डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, १२ एप्रिल – सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पहाता प्रशासनाकडून कोरोना रुग्णांना तात्काळ सुविधा उपलब्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात खासगी आणि शासकीय रुग्णालय अधिग्रहीत करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने रुग्णांना रुग्णालयात भरती करणे, तसेच रुग्णालयातील देयक यांविषयीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्रशासनास प्राप्त होत आहेत. त्यासाठी नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर खाटा उपलब्धेविषयी आणि तक्रार निवारण कक्ष चालू करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

खाटांच्या उपलब्धतेसाठी (महानगरपालिका) संपर्क क्रमांक ०२३३-२३७५५०० आणि ०२३३-२३७४५००, जिल्हा परिषद येथील खाटांच्या उपलब्धतेसाठी संपर्क क्रमांक ०२३३-२३७४९०० आणि ०२३३-२३७५९००, तसेच तक्रार निवारण कक्ष-टोल फ्री क्रमांक १०७७ उपलब्ध करून देण्यात आला आहे.