पुणे – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये २ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लागू होतील, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली; मात्र पी.एम्.पी. बंद करण्याच्या निर्णयाचा भारतीय जनता पक्षाने विरोध केला आहे. संचारबंदी नको तर जमावबंदी लागू करण्याचे आदेश द्या. बससेवा बंद झाल्यास कामगारांचे हाल होतील, तसेच असे म्हणत भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी विरोध दर्शवला आहे. पी.एम्.पी. बंद करू नये, असे म्हणत त्यांनी आस्थापनांशी बोलून गाडीची व्यवस्था करण्यात यावी, असेही म्हटले आहे.