परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांचे मुंबई येथील सेवाकेंद्रात दर्शन घेतांना साधकांना आलेल्या विविध अनुभूती

महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेल्या त्यांच्या पादुकांची प्रतिष्ठापना सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे करण्यात आली आहे. मुंबई येथे प्रतिष्ठापना केलेल्या पादुकांचे दर्शन घेतांना साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

भाग १. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/456426.html

परात्पर गुरु डॉ. आठवले

२ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विराट रूप दिसणे

२ ऊ २. ‘गुरुपादुका पुष्कळ विशाल आहेत’, असे जाणवणे आणि श्रीरामरूपातील गुरुदेवांचे दर्शन होऊन त्यांच्या चरणांजवळ बसल्याचे दिसणे : ‘गुरुपादुकांचे दर्शन होताच ‘त्या पुष्कळ विशाल आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी माझे गुरुमाऊलीला आत्मनिवेदन होत होते. मला गुरुमाऊलीचे अस्तित्व भव्य रूपात आणि पांढर्‍या शुभ्र प्रकाशात जाणवत होते. ‘गुरुमाऊली श्रीरामाच्या रूपात आसनस्थ होऊन माझ्याकडे अत्यंत आनंदाने स्मित हास्य करून पहात आहे’, अशी मला जाणीव झाली आणि त्या वेळी थंड वार्‍याची झुळूक आली. ‘एक-दोन वर्षांच्या लहान बालिकेप्रमाणे मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांजवळ बसले आहे’, असे मला जाणवले.’ – श्रीमती कीर्ती वाघ, बोईसर

२ ए. गुरुपादुकांकडे पाहिल्यावर ‘तेथे प्रत्यक्ष गुरुचरण आहेत’, असे जाणवणे

२ ए १. ‘गुरुपादुका नसून ते गुरुचरणच आहेत आणि गुरुपादुकांंमधून संपूर्ण ब्रह्मांडात पुष्कळ चैतन्य जात आहे’, असे दिसणे : ‘गुरुपादुकांचे दर्शन घेतांना मला निळे आकाश आणि आकाशात पांढरेशुभ्र ढग दिसले. नंतर मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विराट रूप दिसले. मला त्यांचे चरण गुलाबी रंगाचे दिसत होते. गुरुपादुकांकडे पाहिल्यावर ‘त्या गुरुपादुका नसून ते गुरुचरणच आहेत आणि त्यांमधून संपूर्ण ब्रह्मांडात प्रचंड प्रमाणात चैतन्य जात आहे’, असे दिसले. माझा कृतज्ञताभाव जागृत झाला होता.’ – सौ. सिंधु हिंगे, भांडुप

२ ऐ. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या शेजारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचेही दर्शन होणे

२ ऐ १. परात्पर गुरु डॉ. आठवले शेषशायी श्रीविष्णूच्या रूपात आणि त्यांच्या शेजारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचेही दर्शन होणे : ‘गुरुदेव श्रीविष्णूच्या रूपात शेषावर पहुडले आहेत. त्यांच्या चरणांजवळ सप्तनद्या वहात आहेत. त्या तीर्थामध्ये आणि शिवाच्या जटेतून बाहेर पडत असलेल्या गंगाजलात मी चिंब भिजत आहे. पिवळे-निळे आकाश आणि त्या आकाशात चंद्र आहे’, असे दृश्य मला दिसले. ‘गुरुपादुका चैतन्याने भारित झाल्या आहेत’, असे मला जाणवले.श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ समोर उभ्या असलेल्या दिसत होत्या. ‘त्या दोघी माझ्या शेजारी उभ्या आहेत’, अशी अनुभूती त्या वेळी मला आली.’ – सौ. सुनीता कोळी, मीरा रोड

२ ऐ २. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या बाजूला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन होणे अन् ‘गुरुपादुकांमधून निघालेला प्रकाश साधकांकडे प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे : ‘गुरुपादुकांसमोर गेल्यावर माझा भाव दाटून आला आणि ‘हाच क्षण अनुभवण्यासाठी हा मनुष्यजन्म मिळाला आहे’, असा विचार माझ्या मनात आला. नंतर नामजप करत असतांना समोर प्रत्यक्ष गुरुदेव आणि त्यांच्या दोन्ही बाजूला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ दिसत होत्या. गुरुपादुकांच्या सभोवती एक प्रकाशमय आभा जाणवत होती. ‘तो प्रकाश गुरुपादुकांतूनच बाहेर येत आहे आणि तो साधकांकडे प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते. या वेळी ‘सर्व देह, शरीर, मन, बुद्धी, तसेच पेशीन्पेशी शुद्ध होत आहेत’, असे मला जाणवत होते. माझी सतत भावजागृती होत होती. मला पुष्कळ आनंद होत होता.’ – श्री. दयानंद, बोईसर

२ ओ. प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन होणे

२ ओ १. गुरुपादुकांच्या ठिकाणी प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन होणे आणि नामजप करतांना आज्ञाचक्राच्या ठिकाणी निळा प्रकाश दिसून मनाला शांत वाटणे : ‘गुरुपादुकांचे दर्शन घेण्यासाठी मी कक्षात गेले. तेव्हा मला पुष्कळ थंडावा जाणवला. तेथे नामजप करतांना परात्पर गुरुदेवांच्या चरणी आत्मनिवेदन केल्यावर ‘गुरुपादुकांमधून गुलाबी रंगाची फुले बाहेर पडत आहेत आणि त्या फुलांनी पूर्ण कक्ष भरून गेला’, असे मला जाणवले. त्यानंतर मला गुरुपादुकांच्या ठिकाणी प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन झाले. नामजप करतांना मला आज्ञाचक्राच्या ठिकाणी निळा प्रकाश दिसून मनाला शांत वाटत होते.’ – सौ. अनिता शहाणे, कांदिवली

२ ओ २. ‘प.पू. भक्तराज महाराज स्वतःकडे पहात आहेत’, असे दिसणे आणि ‘स्वतः चैतन्याच्या स्रोतात आहे’, असे जाणवणे : ‘गुरुपादुकांचे दर्शन घेतांना ‘चैतन्य माझ्या शरिरात जात आहे’, असे मला जाणवले. मला ब्रह्मकमळ उमलतांना दिसले. मला कक्षामध्ये सर्वत्र चैतन्य जाणवत होते. ‘लादी पुष्कळ गुळगुळीत झाली आहे आणि प.पू. भक्तराज महाराज माझ्याकडे पहात आहेत’, असे मला जाणवले. मला शांत वाटले. ‘मी चैतन्याच्या स्रोतात आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला अन्य कशाचीही जाणीव नव्हती.’ – सौ. द्रौपदी पाटील, बोरिवली

२ औ. मन शांत होणे : ‘गुरुपादुकांचे दर्शन घेतांना माझे मन शांत झाले आणि आनंद वाटला. माझे मन एकाग्र होऊन मला काही वेळ ध्यानावस्था जाणवली. मला गुरुपादुकांवर फणा उभारलेल्या नागराजाचे दर्शन झाले. मला सुगंधाची अनुभूती आली. काही वेळाने मला पाठीत त्रास जाणवून नंतर तो त्रास न्यून होत गेला. मला शरिराला हलकेपणा जाणवला.’

– श्री. बबन भांबुरे, कांदिवली

(समाप्त)

  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक