१. रिक्शाच्या झालेल्या अपघातात साधिकेच्या समवेतच्या व्यक्तींना पुष्कळ दुखापत होणे; मात्र साधिका बोरीच्या झुडुपात पडत असतांना तिला ‘कुणीतरी अलगद झेलले आहे’, असे जाणवणे
‘३.१.२०२४ या दिवशी आम्ही (मी, माझे दीर, माझी बहीण आणि तिच्या जाऊबाई) रिक्शाने जात होतो. माझे दीर रिक्शा चालवत होते. मार्गात एके ठिकाणी आमच्या रिक्शाच्या समोर बैल आला. त्यामुळे माझ्या दिरांचे रिक्शावरील नियंत्रण सुटले. तेव्हा रिक्शा पालथी होऊन एका खड्ड्यात फेकली जाऊन आपटली. त्या वेळी रात्रीचे ८ वाजले होतो.
मी रिक्शाच्या बाहेर फेकले गेले आणि एका झुडपात पडले. त्या वेळी ‘मला कुणीतरी अलगद झेलले आहे’, असे जाणवले. ‘काय झाले ?’, हे मला रिक्शातून बाहेर पडल्यानंतरही समजले नाही. माझे दीर बोरीच्या झुडपामध्ये पडल्यामुळे त्यांच्या शरिरात बोरीचे काटे घुसले आणि त्यांना जखमा झाल्या. माझी बहीण आणि तिच्या जाऊबाई रिक्शामध्येच होत्या. रिक्शा आपटल्यामुळे त्यांना पुष्कळ दुखापत झाली होती. खरेच या प्रसंगातून ‘ईश्वराचे अस्तित्व आहे’, असे मला जाणवले.
२. भीषण अपघातात साधिकेला काहीही इजा न होणे आणि ईश्वराची कृपा अनुभवून तिची भावजागृती होणे
मी काळोखातून उजेडात आल्यावर मला समजले, ‘मी बोरीच्या झाडावर पडले होते.’ तेही माझ्या साडीला लागलेल्या काट्यांमुळे माझ्या लक्षात आले. माझ्या शरिराला एकही काटा टोचला नव्हता किंवा मला कुठे खरचटलेही नव्हते. मी व्यवस्थित होते. तेव्हा मला कळले, ‘ईश्वराने मला वाचवले आहे.’ एवढा मोठा अपघात होऊनही मी वाचले. तेव्हा ‘ईश्वर आहे’, असे वाटून माझी भावजागृती झाली.
मी स्वतःची साधना निश्चितच वाढवणार आहे.’
– सौ. पूनम कानिफनाथ मरागजे, वडवळ, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. (जुलै २०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |