महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेल्या त्यांच्या पादुकांची प्रतिष्ठापना सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे करण्यात आली आहे. मुंबई येथे प्रतिष्ठापना केलेल्या पादुकांचे दर्शन घेतांना साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. गुरुपादुकांचे दर्शन घेतांना सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे
१ अ. आवरण दूर होऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे
१ अ १. त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होऊन गुरुपादुकांसमोर बसून नामजप करतांना सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टर समोर बसले असल्याचे जाणवणे : ‘गुरुपादुकांचे दर्शन घेण्यापूर्वी मला शरीर जड वाटत होते. मी गुरुपादुकांचे दर्शन घेतल्यावर माझ्याभोवती असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होऊन मला हलकेपणा जाणवला. मला ध्यानमंदिरात पुष्कळ गारवा जाणवत होता. तेथे थोडा वेळ नामजप केल्यावर सूक्ष्मातून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्यासमोर बसले आहेत आणि पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.’
– सौ. संचिता ठाकूर, अंधेरी
१ अ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे आणि गुरुपादुकांच्या दर्शनानंतर डोके दुखायचे थांबणे : ‘गुरुपादुकांचे दर्शन घेत असतांना पिवळा सदरा घातलेले परात्पर गुरु डॉ. आठवले हसतमुख वदनाने माझ्याकडे पहात आहेत’, असे मला दिसले. ‘मला होत असलेला त्रास दूर होऊ दे’, अशी प्रार्थना केल्यावर मला डोकेदुखी चालू झाली आणि नंतर ‘डोके दुखायचे कधी थांबले ?’, ते मला कळले नाही.’ – सौ. ज्योती घाटकर, मुलुंड, मुंबई.
२. भावजागृती होऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे
२ अ. भावजागृती होऊन आदल्या दिवसापासून होत असलेला त्रास न्यून होणे : ‘आदल्या रात्रीपासून मला पुष्कळ त्रास होत होता. गुरुपादुकांचे दर्शन घेतल्यानंतर माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘भगवंतच भेटला’, असे मला जाणवले. मला पितांबर नेसलेले आणि चाफ्याच्या फुलांचा हार गळ्यात घातलेले परात्पर गुरु डॉक्टर दिसले. ते सुंदर, मनोहर रूप पाहून मला पुष्कळ आनंद झाला. परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘आलात का ?’ मी ‘हो’ म्हणाले. नंतर ते मला पुष्कळ हसतांना दिसले.’ – सौ. भक्ती देवरुखकर, मीरा रोड
२ आ. पांढर्या पोशाखातील गुरुमाऊलीचे दर्शन होणे : ‘गुरुपादुकांच्या समोर उभे राहिल्यावर माझा भाव जागृत झाला. ‘पांढर्या पोशाखातील गुरुमाऊली प्रत्यक्ष उभी आहे’, असे मला वाटत होते. माझ्या डोळ्यांसमोर गुरुचरण येऊन माझ्या डोळ्यांत पाणी आले आणि माझ्याकडून पुष्कळ प्रार्थना झाल्या.’
– सौ. विद्या नलावडे, मुलुंड
२ इ. प्रत्यक्ष दर्शन घेतांना अष्टसात्त्विक भाव जागृत होऊन परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे : ‘मी ध्यानमंदिरात जाताक्षणी मला गार झुळूक जाणवली. तेथे पुष्कळ गारवा आणि प्रकाश जाणवला. गुरुपादुकांचे दर्शन घेतांना माझ्या शरिराला कंप सुटला होता. माझा अष्टसात्त्विक भाव जागृत झाला. मी डोळे मिटल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले समोर बसले आहेत आणि ते हसत आहेत’, असे मला जाणवले. माझ्या डोळ्यांतून अश्रू वहात होते. मला आतून केवळ ‘कृतज्ञ, कृतज्ञ’ असा ध्वनी ऐकू येत होता. ‘पांढरा प्रकाश माझ्या सहस्रारातून शरिरात आणि सर्व चक्रांमध्ये जात आहे’, असे मला जाणवले. मला हलकेपणा जाणवला. त्यानंतर मी शांत आणि स्थिर झाले.’
– सौ. सुजाता शेट्ये, मुलुंड
२ उ. गुरुपादुकांचे दर्शन घेतल्यावर शेवंतीच्या फुलांचा सुगंध येणे आणि गुरुदेवांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवून भावजागृती होणे : ‘गुरुपादुकांचे दर्शन घेतल्यावर मला शेवंतीच्या फुलांचा सुगंध येऊ लागला. त्यांना वंदन केल्यावर ‘माझ्या मस्तकातून चैतन्य आत जात आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर माझ्या शरिरावर रोमांच आले. ‘गुरुमाऊली समोर बसली असून ती सर्वांना आशीर्वाद देत आहे आणि संपूर्ण कक्षामध्ये चैतन्य पसरले आहे. जसा देव पुंडलिकाच्या भेटीला आला, तशी गुरुमाऊली जणू सर्व भक्तांसाठी आली आहे’, असे वाटून माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.’
– सौ. रंजना भुजबळ, कांदिवली
२ ऊ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले समोर आहेत’, असे जाणवणे
२ ऊ १. ‘परात्पर गुरु डॉक्टर समोर बसले आहेत आणि ते सर्व साधकांकडे पहात आहेत’, असे जाणवणे : ‘गुरुपादुकांचे दर्शन घेतांना मला पुष्कळ आनंद जाणवत होता. काही काळ ‘मी कुठे आहे ?’, ते मला कळले नाही. ‘परात्पर गुरु डॉक्टर समोर बसले आहेत आणि ते सर्व साधकांकडे पहात आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्या छायाचित्राकडे बघितल्यावर ‘ते काहीतरी बोलत आहेत’ असे मला वाटले. तेव्हा माझी भावजागृती झाली.’ – श्री. गणेश पवार, बोरिवली पूर्व
२ ऊ २. ‘गुरुमाऊलीच्या चरणांतून चैतन्य प्रक्षेपित होऊन त्याचा वर्षाव होत आहे आणि अनिष्ट शक्तीचा त्रास न्यून होत आहे’, असे जाणवणे : ‘आतापर्यंत प्रतिदिन सूक्ष्मातून गुरुमाऊलीच्या पादुकांचे दर्शन घेत होते. आज स्थुलातून गुरुपादुकांचे दर्शन घेतांना आणि गुरुमाऊलीच्या चरणांवर नतमस्तक होऊन प्रार्थना करतांना ‘गुरुमाऊलीचे दर्शन घेत आहे’, असे मला जाणवले. ‘गुरुमाऊलीच्या चरणांतून चैतन्य प्रक्षेपित होऊन माझ्यावर त्या चैतन्याचा वर्षाव होत आहे. माझा त्रास न्यून होत आहे’, असे मला जाणवले. त्यांच्या चरणांवर स्वस्तिक काढल्याचे दिसत होते.’ – सौ. स्मिता तांडेल, अंधेरी
२ ए. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विराट रूप दिसणे
२ ए १. ‘गुरुपादुकांमधून धर्मकार्यासाठी शक्तीचा स्रोत प्रक्षेपित होत असून भ्रूमध्यातून ती शक्ती संपूर्ण देहात शिरून सर्व पेशीपेशींत जात आहे आणि त्रासदायक शक्तीचे विघटन होत आहे’, असे जाणवणे अन् गुरुदेवांचे श्रीविष्णूच्या रूपातील भव्य रूप दिसणे : ‘ध्यानमंदिरात प्रवेश करताच मी द्वापरयुगात असून ऋषिमुनींच्या पर्णकुटीत प्रवेश केला आहे’, असे मला वाटले. ‘ऋषिमुनी आणि देवता यांच्यासह आम्ही सर्व साधक गुरुपादुकांसमोर बसून नामजप करत आहोत’, असे वाटून मी क्षणभर स्वतःचे अस्तित्व विसरलो. त्या वेळी माझे मन निर्विचार झाले होते. ‘गुरुपादुकांमधून धर्मकार्यासाठी शक्तीचा स्रोत प्रक्षेपित होत आहे. माझ्या भ्रूमध्यातून शक्ती संपूर्ण देहात शिरून सर्व पेशीपेशींत जात आहे आणि त्रासदायक शक्तीचे विघटन होत आहे’, असे मला जाणवत होते. त्या वेळी मला विशिष्ट गंध अनुभवायला आला. मला गुरुदेवांचे श्रीविष्णूच्या रूपातील भव्य-दिव्य रूप समोर दिसत होते.’ – श्री. प्रवीण पाटील, भांडुप
(क्रमशः उद्याच्या अंकात)
उर्वरित भाग पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/456565.html
|