बंगालमध्ये कोरोनावरील लस सर्वांना विनामूल्य देणार ! – मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांची घोषणा

ममता बॅनर्जी

कोलकाता – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘राज्यातील सर्व गरजू नागरिकांना कोरोनावरील लस विनामूल्य देण्यात येईल’, अशी घोषणा केली आहे.  बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार असल्याने सरकारने अशी घोषणा केल्याचे म्हटले जात आहे. देशात कोरोनावरील लसीकरण मोहिमेला १६ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे.