कोविड लसीकरण : सविस्तर भूमिका !

कोरोनावरील उपचारांचे आरोग्यावर दुष्परिणाम ?

वैद्य परीक्षित शेवडे

नोव्हेंबर २०२० मध्ये मुंबईमध्ये ‘Guillain Barre Syndrome (GBS)’च्या २४ केसेस ‘कोविड’ होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये आढळून आल्या. या विकारामध्ये शरिराची रोगप्रतिकार क्षमता ही आपल्याच शरिरावर आघात करून रुग्णाला पक्षाघाताच्या दिशेने नेते. या अवस्थेला बहुतांश वेळेस श्‍वसनसंस्था किंवा पचनसंस्था यांचा विषाणूजन्य संसर्ग कारणीभूत असतो. अशी अवस्था लक्षात येताच उपचार केल्यास तिच्यामधून बरे होण्याची शक्यता अधिक प्रमाणात वाढते. हे वृत्त वाचल्यानंतर स्वाभाविकपणे मनामध्ये प्रश्‍न येतो की, ही अवस्था कोविडमधून बर्‍या झालेल्या रुग्णांमध्ये नेमकी कोरोना संसर्गामुळे उद्भवली कि असमाधानकारक आणि परिणामकारक नसलेल्या उपचारांमुळे ? कारण कोविड जन्माला येऊन एक वर्ष होऊन गेले, तरी आजही १०० टक्के खात्रीशीर नैदानिक चाचणी किंवा उपचार आधुनिक वैद्यकाकडे उपलब्ध नाही. दुसर्‍या हाताला ‘हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’, ‘टोसिलिझुमाब’, ‘रेमडेसेविर’ आणि सर्रास केला जाणारा व्हेंटिलेटरचा वापर यांनी रुग्णांना लाभ होण्यापेक्षा हानीच अधिक झाल्याचे मात्र खंडीभर पुरावे आता उपलब्ध आहेत. स्वतः जागतिक आरोग्य संघटनेनेही याला पुष्टी दिली आहे.

लसीसंदर्भात आलेला कटू अनुभव

​आम्ही बी.ए.एम्.एस्. शिकत असतांना तत्कालीन गोवा राज्य सरकारने सगळ्या शाळा आणि महाविद्यालये येथे ‘एम्.एम्.आर्.’ (MMR) लस अनिवार्य केली होती. हे लसीकरण कुठेही तर्काधारित नसल्याने आमच्यासारख्यांनी यास विरोध केला होता; मात्र याला न जुमानता हे लसीकरण आमच्या महाविद्यालयातील अनुमाने १०० मुलींना केले गेले. त्यांच्यापैकी १० टक्के जणींना तीव्र ज्वर, तर ५ टक्के जणींना ‘गालगुंडसदृश’ लक्षणे दिसून आली. येथे लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे गालगुंड होऊ नये, याकरता दिल्या गेलेल्या लसीने ‘गालगुंडसदृश’ लक्षणे निर्माण केलेली होती; मात्र या सगळ्यात धक्कादायक म्हणजे माझी वर्गमैत्रीण, जिने आपले नाव सार्वजनिक न करण्याच्या अटीवर हा अनुभव सार्वजनिक करण्यास होकार दिला आहे; तिच्यासंदर्भात घडली. ही लस दिल्याच्या रात्री त्या मुलीच्या कमरेखालचा भाग लुळा पडला. त्यानंतर तिला झालेले त्रास आणि वेदना आम्ही स्वतः पाहिलेल्या आहेत. आजही तिच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास ‘या घटनेने माझे संपूर्ण आयुष्य पालटले.’ ही स्थिती उद्भवण्यापूर्वी तिला कोणत्याही प्रकारचे विकार नसून ती शारीरिकदृष्ट्या पूर्णतः सक्षम होती. तिला दिली गेलेली ‘एम्.एम्.आर्.’ लस ही गेली काही दशके ‘सुरक्षित लस’ म्हणूनच सांगितली जाते. इतकेच नव्हे, तर ‘या लसीचा ‘जी.बी.एस्.’शी कोणताही संबंध नाही’, असे सांगणारे ‘रिसर्च पेपर’ही आढळतात; मात्र आधी नमूद केल्याप्रमाणे ‘जी.बी.एस्.’ हा विषाणूजन्य संसर्गाने होत असतो. अशा परिस्थितीमध्ये जी लस विषाणूंना तथाकथित ‘अकार्यक्षम’ बनवून सिद्ध केली जाते; त्याने असे घडवून आणले नसेल यासंदर्भात आपण कुणीही निश्‍चिती देऊ शकतो का ?

कोविड लस विश्‍वासार्ह ?

​भारतातील कोविड लसीच्या आघाडीच्या उत्पादकांनी सिद्ध केलेली लस ही ‘अडीनोव्हायरस’ नामक चिंपांझी माकडांमध्ये सर्दी निर्माण करणार्‍या विषाणूच्या गुणसूत्रांमध्ये काही पालट करून निर्माण करण्यात आलेली आहे. लस टोचून घेतल्यानंतर मानवी शरिरात कोरोना विषाणूशी साधर्म्य असलेल्या या विषाणूमुळे प्रतिकारशक्ती निर्माण होईल आणि पुढे कोरोनाचे संक्रमण झाल्यास लढण्याचे बळ मिळेल, असे तत्त्व त्यामागे आहे; मात्र या उत्पादकांच्या मातृसंस्थेने लसीसंबंधित आकडेवारी घोषित करत असतांना घातलेला गोंधळ हा जगासमोर आहे. त्या पलीकडे जाऊन ‘ट्रायल्स’ची (चाचण्यांची) प्रक्रिया पूर्ण न केलेल्या कोणत्याही आधुनिक औषधावर विश्‍वास ठेवणे, हे शहाणपणाचे वाटत नाही.

कोविडवरील लसीसंदर्भात वैद्यक आणि औषधनिर्माण क्षेत्र यांच्यात एकमताचा अभाव

​अगदी आधुनिक वैद्यक आणि औषधनिर्माण क्षेत्र यांच्यात लसीसंदर्भात एकमत नाही. ‘फायझर फार्मा’चे भूतपूर्व उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध श्‍वसनसंस्था विकारतज्ञ डॉ. मायकल यीडन म्हणतात, ‘‘जागतिक संसर्ग रोखण्यास ‘व्हॅक्सिन’ची (लसीची) कोणतीही आवश्यकता नाही. व्हॅक्सिनसंदर्भात इतका मूर्खपणा मी आजवर कधीही पाहिलेला नाही. रोगापासून धोका नसलेल्या लोकांना ‘व्हॅक्सिन’ द्यायची नसतात. ज्या ‘व्हॅक्सिन’ची संपूर्ण चाचणी झालेली नाही, अशी ‘व्हॅक्सिन’ कोट्यवधी निरोगी लोकांना देण्याचा घाट घालणेही चूकच !’’ यीडन यांचा मुद्दा बिनतोड आहे. कित्येक डॉक्टरही स्वतः लस घेण्यासंदर्भात सकारात्मक नाहीत. ‘आपल्या सुरक्षेसाठी नाही, तर समाजाच्या सुरक्षेसाठी लसीकरण करा’, असाही सूर काही जण आळवत आहेत. त्यांच्या माहितीसाठी लस बनवण्यात आघाडीवर असणार्‍या ‘फायझर फार्मा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अल्बर्ट बोरला यांनी म्हटले आहे, ‘‘लस घेतलेल्या व्यक्तीकडून अन्य व्यक्तीकडे विषाणू संक्रमित होणार नाही, याची कोणतीही निश्‍चिती नाही.’’

आयुर्वेदाकडे दुर्लक्ष करणे षड्यंत्र नव्हे का ?

​यावरून लसीकरण हाच जणूकाही शेवटचा उपाय आणि कोरोनापासून त्राता असल्याचे भासवले जाणे कितपत योग्य ? तसेच दुसरीकडे आयुर्वेदाला अगदी पहिल्यापासूनच सतत संधी नाकारली जाऊनदेखील संधी मिळताच या महासंसर्गात ते अतिशय प्रभावीपणे काम करत आहे; त्याकडे आजही केले जाणारे दुर्लक्ष, हे याच लस षड्यंत्राचा भाग असावा का ? अशी शंका येण्यास वाव आहे !

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली, जिल्हा ठाणे

(संदर्भ : दैनिक ‘तरुण भारत’, ६ डिसेंबर २०२०)