१. वंशपरंपरा निर्माण करणारे हिंदु विवाह !
अ. ‘अनादी काळापासून हिंदु संस्कृती अस्तित्वात आहे, तसेच ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे जगाला तिचे आश्चर्य वाटते. ते हिंदु संस्कृतीला मान देतात; कारण देवता, अवतार, ऋषिमुनी, ४ वेद, १८ पुराणे हे आमचे आदर्श आहेत. यात सांगितलेल्या गोष्टी आणि मूल्ये हे सर्व भारतियांना शिरसावंद्य आहेत. प्रत्येक हिंदूचे आचरण आणि दिनचर्या कशी आदर्श असावी, हे आम्हाला सांगितलेले आहे.
आ. संस्कृतीनुसार विवाह व्यवस्थेमध्ये पालकांना त्यांच्या पाल्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. वरील विवाह वंशपरंपरा निर्माण करतात. हे विवाह कौटुंबिक मिळकत आणि स्थावर-जंगम संपत्ती जतन करतात. ही विवाहपद्धत ज्येष्ठांना अंतर्प्रेम जोपासण्यासाठी साहाय्यभूत ठरते.
२. मोगल आणि ख्रिस्ती आक्रमकांनी हिंदु संस्कृतीवर आघात करणे
मोगल आणि ख्रिस्ती यांच्या आक्रमकांनी हिंदु संस्कृतीवर मोठा आघात केला. परकीय आक्रमणकर्त्यांनी हिंदु संस्कृती अन् तिची वैशिष्ट्यपूर्ण मूल्ये यांवर घाला घातला. त्यांनी त्यांचा पंथ वाढवण्यासाठी आदर्श हिंदु संस्कृती मोडकळीस कशी आणता येईल आणि त्या माध्यमातून हिंदूंचे धर्मांतर कसे करता येईल, हाच उद्देश सदैव ठेवला. त्यानंतर बलपूर्वक विवाह, स्त्रियांची विटंबना, धर्मांतर, मंदिरांची तोडफोड आणि त्यातील संपत्तीची लूट अनेक दशके चालू राहिली. विश्वासघात हे मुसलमानांचे मुख्य अस्त्र आहे. जेथे जेथे मुसलमानांची राजवट होती, तेथे तेथे हिंदूंंचे धर्मांतर करणे, हिंदु संस्कृतीवर घाला घालणे, हे प्रयत्न सातत्याने केले गेले.
३. हिंदु संस्कृती नष्ट करणारी ब्रिटिशांची मेकॉले शिक्षणपद्धत
३ अ. ब्रिटिशांनी भारतावर अनुमाने १५० वर्षे राज्य केले. त्यांनी व्यापारी म्हणून आल्यावर दीड-दोन शतके हिंदु संस्कृती संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. ब्रिटिशांच्या राजवटीत गुरुकुलपद्धत संपवून मेकॉले शिक्षणपद्धत रूढ करण्यात आली. ब्रिटिशांनी भारतियांवर ‘हिंदु संस्कृती ही बुरसट आणि जुनाट आहे, यात पाश्चात्त्यांना अपेक्षित असे पालट व्हावे’, ही विचारसरणी थोपवली.
३ आ. जाणीवपूर्वक हिंदूंना धर्मशिक्षण मिळू नये, तसेच हिंदूंनी मुसलमान किंवा ख्रिस्ती यांचा अनुनय करावा, हे तलवारीच्या जोरावर अथवा विश्वासघाताने करण्यात आले. राज्यव्यवस्था ही धर्मांधांच्या हाती गेल्याने आणि ती अनेक दशके त्यांच्या हाती असल्याने ऋषिमुनी, संत, तसेच प्रखर हिंदुत्वनिष्ठ यांचा प्रभाव न्यून करण्याचा सातत्याने प्रयत्न झाला. पुढे पुढे तर धर्मांधांच्या भीतीने राज्य करणार्या पंथियांचा अनुनय हिंदू कसे करतील, असेच प्रयत्न झाले. जाणीवपूर्वक धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था बुडवण्यात आली.
३ इ. अनेक क्रांतीकारक, हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु धर्मातील आचार्य यांना गुप्तपणे कार्य करावे लागले. त्यांनी परकियांच्या हातात असलेल्या राज्यव्यवस्थेचा हिंदु धर्मावर परिणाम होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न केले. योगी अरविंद घोष यांनी तर साधना आणि धर्मप्रसार यांचा मार्ग निवडला. काळानुसार पालट केले.
३ ई. वर्ष १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला; परंतु त्या वेळी समाजमनावर मेकॉले शिक्षणपद्धत आणि पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्याची सवय मोठ्या प्रमाणावर भारतीय समाजात रूळली. त्यामुळे हिंदु समाज, संस्कृती आणि नैतिक मूल्ये यांची प्रचंड हानी झाली. ती दूर करण्याचे विशेष प्रयत्न नेहरू-गांधी घराण्याने केले नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस असे अनेक आदर्श स्वातंत्र्यसेनानी असतांना दुर्दैवाने ब्रिटिशांनी नेहरू-गांधी यांना त्यांचे वारस म्हणून अप्रत्यक्षरित्या नेमले. ब्रिटीश गेले; पण पाश्चात्त्य शिकवण भारतियांनी जोपासावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
श्रीकृष्णार्पणमस्तु !’
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय. (२४.१०.२०२०)