व्याकरणाच्या चुका करणारा जगातील एकमेव देश भारत ! उत्तरदायींना शिक्षा करा !

फलकावर ‘फी प्लाझा’ ऐवजी ‘फीस प्लाझा’, असे लिहिले आहे.

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. या मार्गावर विविध ठिकाणी मार्गदर्शक फलक, गावांची नावे, सूचनांचे फलक लावण्यात आले आहेत. या महामार्गाचे काम करणार्‍या ‘दिलीप बिल्डकॉन’ या आस्थापनाकडून लावण्यात आलेल्या पथदर्शक आणि माहितीदर्शक फलकांवरील मराठी शब्द अत्यंत अशुद्ध असल्याने भाषाप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.’