संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्यासाठी पंढरपूर येथून श्री विठ्ठलाच्या पादुकांचे आळंदीकडे प्रस्थान

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – आळंदी येथे होत असलेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्यासाठी पंढरपूर येथून श्री विठ्ठलाच्या पादुकांचे प्रस्थान करण्यात आले.

११ डिसेंबर या दिवशी सकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे श्री विठ्ठलाच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आळंदी येथे होत असलेल्या श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज समाधी सोहळ्यासाठी श्री संत नामदेव महाराज स्मारक येथून फुलांनी सजवलेल्या बसमध्ये श्री विठ्ठलाच्या पादुका ठेवून पादुकांचे आळंदीकडे प्रस्थान करण्यात आले.