सध्याच्या शिक्षणपद्धतीची उपयुक्तता (?) आणि हिंदु शिक्षणपद्धतीची आवश्यकता

कुठे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून शिक्षणाकडे पहाणारी निधर्मी शिक्षणपद्धती, तर कुठे व्यक्तीच्या जीवनाला सत्त्वगुणाकडे नेण्याची दिशा दाखवणारी हिंदु शिक्षणपद्धती !

‘भारतीय दर्शनामध्ये पुनर्जन्माचा सिद्धांत असा आहे, जो समजल्यावर सृष्टीविषयक अधिकांश गुंता (रहस्य) सुटतो. मनुष्याचा वर्तमान जन्म हा अनंत जन्मांच्या शृंखलेतील एक कडी आहे आणि त्याचे जन्मजात संस्कार मागील जन्मांमध्ये त्याने केलेल्या कार्यांचा परिणाम असतो. मानव स्वभावाला संस्कारानुसार मुख्यतः सात्त्विक, राजसिक आणि तामसिक भागांमध्ये विभागले आहे; परंतु मनुष्याच्या आजूबाजूचे वातावरण म्हणजेच शिक्षण अन् साधना यांमुळे सकारात्मक दिशेकडे परिवर्तन होऊ शकते अन् हाच शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.

गुरुकुल शिक्षण पद्धती

गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाल्यावर म्हणजेच सोळा संस्कार पूर्ण झाल्यावर एक दीक्षांत सोहळा होत असे. ज्यामध्ये राज्याचे प्रतिनिधी आणि हितचिंतक उपस्थित रहात होते. गुरुकुलाचे आचार्य गुणसंवर्धनाच्या आधारावर ते आपल्या शिष्यांमधील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांपैकी कोणत्याही एका वर्णाचे वर्णन सांगत होते, ज्यामुळे समाजात परतणार्‍या ब्रह्मचार्‍यांना समाजाच्या आवश्यकतेनुसार नियोजन करता येईल. दुसर्‍या बाजूला दीक्षांत समारंभाच्या वेळी आचार्य शिष्यांना काही व्रत धारण करण्याचा उपदेश सांगत उदाहरणार्थ ‘सत्यं वद’, ‘धर्मं चर’, ‘स्वाध्यान्मा प्रमदः’ अर्थात् सत्याचरण करणे, धर्माचरण करणे, जीवनात स्वाध्यायाचा क्रम निरंतर ठेवणे इत्यादी.

यानंतर आचार्य शिष्यगणांना शेवटी असे सांगत,

यानि अनवद्यानि कर्माणि । तानि सेवितव्यानि । नो इतराणि ।
यानि अस्माकं सुचरितानि । तानि त्वयोपास्यानि । नो इतराणि ॥

तैत्तिरीयोपनिषद्, शिक्षावल्ली, अनुवाक् ११, वाक्य २

अर्थ : आमची जी अनिंदित (चांगली) कर्मे असतील तीच करावीत, अन्य नाहीत. आम्ही जी सत्कर्मे केली, तीच तुमच्याकडून केली जावीत, अन्य कोणतीही नाहीत.

ये तत्र ब्राह्मणाः सम्मर्शिनः । युक्ता आयुक्ताः । अलूक्षा धर्मकामाः स्युः । यथा ते तत्र वर्तेरन् । तथा तत्र वर्तेथाः । एषः आदेशः । एष उपदेशः ॥
– तैत्तिरीयोपनिषद्, शिक्षावल्ली, अनुवाक् ११, वाक्य ४

अर्थ : जे ब्राह्मण सुविचारी, श्रद्धाळू आहेत, दुसर्‍याद्वारे नियंत्रित न होणारे आहेत, कठोर किंवा क्रौर्य करणारे नाहीत, धर्माचरणी आहेत; ते ज्याप्रमाणे वागतात, त्याप्रमाणे तुम्ही आचरण करावे. हा आदेश आहे, उपदेश आहे.

(संदर्भ : गीता स्वाध्याय, मे २०१७)