हसतमुख, आनंदी आणि इतरांना समजून घेणारे चि. प्रशांत सोन्सुरकर अन् प्रेमभाव आणि व्यष्टी साधनेचे गांभीर्य असलेली चि.सौ.कां. अनिता सुतार !

१७.११.२०२० या दिवशी शिरोडा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील चि. प्रशांत प्रभाकर सोन्सुरकर आणि म्हापसा (गोवा) येथील चि.सौ.कां. अनिता नारायण सुतार यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. प्रशांत सोन्सुरकर आणि चि.सौ.कां. अनिता सुतार

चि. प्रशांत सोन्सुरकर आणि चि.सौ.कां. अनिता सुतार यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. चि. प्रशांत सोन्सुरकर यांची गुणवैशिष्ट्ये

१ अ. हसतमुख आणि आनंदी : ‘प्रशांतदादा नेहमी हसतमुख असतात. त्यांचा स्वभाव शांत आहे. ते कोणत्याही गोष्टीचा ताण घेत नाहीत. आहे त्या परिस्थितीत ते आनंदी रहातात.

१ आ. दादा नेहमी इतरांना समजून घेतात. ते सतत शिकण्याच्या स्थितीत असतात.

१ इ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : दादा व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करतात. एखादा दिवस व्यष्टी साधना पूर्ण झाली नाही, तर दादा रात्री जागून ती पूर्ण करूनच झोपतात आणि सकाळीही लवकर उठतात.

१ ई. एखादी अडचण आल्यावर ती अडचण सोडवण्यासाठी दादा नामजपादी उपाय करतात, तसेच ते देवाला शरण जाऊन प्रार्थना करतात.

१ उ. दादा दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतात आणि ‘ऑनलाईन’ प्रसारसेवा करतात.

– कु. आरती नारायण सुतार

२. चि.सौ.कां. अनिता सुतार यांची गुणवैशिष्ट्ये

अ. अनिताताईचे रहाणीमान साधे आणि सात्त्विक आहे.

आ. ताई घरात मोठी असल्याने तिने आमची आईप्रमाणे काळजी घेतली. त्यामुळे तिचा आम्हाला पुष्कळ आधार वाटतो.

इ. ताई आम्हा सर्वांना सतत प्रार्थना करण्याची आठवण करून देते. त्यामुळे सर्वांकडून सतत प्रार्थना होते.

ई. ‘नामजप करतांना प्रार्थना कशी करावी ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. याविषयी मी ताईला सांगितल्यावर तिने मला ‘प्रार्थना कशी करायची ?’, तेे लिहून दिले. त्यामुळे मला नेमकेपणाने आणि व्यवस्थित प्रार्थना करता आली.

उ. ताई व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करते. ‘व्यष्टी साधनेच्या आढाव्यामध्ये सर्व सूत्रे व्यवस्थित सांगता यावीत’, यासाठी ताई वेळोवेळी सर्व सूत्रे लिहून ठेवते.

‘दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन आनंदाचा संसार करावा आणि दोघांनीही साधना करून गुरुचरणी अर्पण व्हावे’, हीच आजच्या शुभदिनी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करते.’

– कु. आरती नारायण सुतार (चि. अनिता यांची बहीण) आणि कुटुंबीय, म्हापसा, गोवा. (३.११.२०२०)


असे हे दोन जिवांचे नाते, दोन कुटुंबांचे नाते ।

लग्न म्हणजे दोन जिवांचे नाते, दोन कुटुंबांचे नाते ।
पाहिले तर सोपेही नाही, पाहिले तर कठीणही नाही ॥ १ ॥

प्रत्येकाच्या प्रकृतीवर, प्रत्येकाच्या विचारावर ।
हवे तसे आकार देऊ शकतो, हवे तसे बनवू शकतो ॥ २ ॥

केवळ मनामध्ये जिद्द हवी, सगळे करून दाखवण्याची ।
लग्न म्हणजे एक संधी असते, स्वतः घडण्याची अन् इतरांना घडवण्याची ॥ ३ ॥

अडचणी येतील अनेक, घाबरून जाऊ नकोस ।
घे नाम देवाचे मुखी, भीती बाळगू नकोस ॥ ४ ॥

या गाठी देवाने बांधल्या आहेत, हे विसरून जाऊ नकोस ।
देवाची साथ भेटेल प्रत्येक क्षणी, प्रयत्न कमी पडू देऊ नकोस ।
मनामध्ये देवाप्रती असलेली श्रद्धा कधी डळमळू देऊ नकोस ॥ ५ ॥

कर प्रयत्न साधनेचे, नक्कीच आनंदी रहाशील ।
समजून घे देवाची लीला, नक्कीच पुढे जाशील ॥ ६ ॥

तेवत राहून दे ज्योत तिच्या प्रयत्नांची ।
हीच प्रार्थना आजच्या शुभदिनी गुरुचरणी ॥ ७ ॥

– कु. आरती नारायण सुतार, म्हापसा, गोवा. (३.११.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक