छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींचे मळगाव (तालुका सावंतवाडी) येथे १९ नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन

सावंतवाडी – दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र, विभाग सिंधुदुर्गच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींचे प्रदर्शन मळगाव येथे भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन १९ नोव्हेंबरपर्यंत चालू रहाणार आहे. शिवप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानने केले आहे.

या प्रदर्शनात सिंधुदुर्गातील मनोहरगड, सिंधुदुर्ग किल्ला, मनसंतोषगड, सर्जेकोटगड, रांगणागड, भरतगड, रामगड, पारगड, हनुमंतगड, विजयदुर्ग किल्ला, देवगड किल्ला यांच्यासह अन्य किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे.