हिंदु स्त्रियांनो, स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून स्वतःचे रक्षण स्वतःच करा !

१. सुशिक्षित मुलींच्या ‘तोकडे कपडे घालणे आणि पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करणे हेच स्वातंत्र्य अन् प्रगती आहे’, अशा विचारसरणीमुळे बलात्कारासारख्या घटना घडणे

‘सध्या समाजातील स्वतःला बुद्धीवादी किंवा साम्यवादी म्हणवून घेणार्‍या लोकांना धर्मांधांचे खरे रूप कधी दिसतच नाही. हिंदूंंना ‘खरे काय ?’, हे समजत नाही. त्यांची स्थिती भरकटल्यासारखी झाली आहे. सुशिक्षित मुलींची विचारसरणी स्त्रियांना लाजवेल, अशी झाली आहे. ‘खरेच त्या शिक्षित कि अशिक्षित आहेत ?’, असा प्रश्‍न पडतो. आई-वडिलांनी मुलींना ‘रात्री घराबाहेर एकटी जाऊ नकोस’, असे म्हटले, तर मुलींच्या स्वातंत्र्याला तडा जातो. तोकडे कपडे घालणे, पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणे, हेच त्यांचे स्वातंत्र्य असते. ‘असेे विचार म्हणजे प्रगती’, असे त्यांना वाटते. त्यांना याविषयी कुणी बोललेले आवडत नाही. ‘बलात्कार घडण्याला त्या स्वतःही कारणीभूत असतात’, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांचा प्रश्‍न असतो, ‘तोकडे कपडे न घालताही बलात्कारासारख्या घटना घडतात ना ?’ अशा घटना घडण्यामागे कारणे अनेक आहेत; पण त्यासाठी प्रयत्न करणेही आवश्यक आहे.

हिंदूंनी धर्माचरण केले आणि स्त्रियांनी स्वरक्षण प्रशिक्षण घेतले, तर अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत.

२. आरोपीला कठोर शिक्षा न झाल्याने बलात्कारासारख्या भयावह घटना न टळणे

अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाने वासनांधांना कठोर शिक्षा द्यायला हवी. निर्भया प्रकरणातील एका आरोपीला अल्पवयीन म्हणून सोडून दिले. त्यामुळे वासनांधांना भीती राहिलेली नाही.

शिवरायांनी असा गुन्हा केलेल्या आरोपीचे हात-पाय छाटण्याची शिक्षा दिली होती. त्यांनी दिलेल्या या शिक्षेमुळे त्यानंतर दुष्कृत्य करण्याचे कुणाचेही धाडस झाले नाही.

३. हिंदु स्त्रियांनो, ‘आपले रक्षण कुणीतरी करील’, असा विचार न करता धर्माचरण करून देवाचेच साहाय्य घ्या !

आजची स्त्री धर्माचरण विसरली आहे. ‘कुणीतरी आपले रक्षण करील’, असे तिला वाटते; परंतु आता देवाचे साहाय्य घेऊनच आपले रक्षण होऊ शकते. ज्याप्रमाणे महाभारतात द्रौपदी आपल्या ज्येष्ठांवर, तसेच पतींवर अवलंबून होती. ते सर्व महारथी असूनही तिचे रक्षण करू शकले नाहीत. शेवटी तिला श्रीकृष्णाचे साहाय्य घ्यावे लागले आणि त्यानेच तिचे रक्षणही केले. त्यामुळे स्त्रियांनो, स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आणि धर्माचे आचरण करून स्वतःचे रक्षण स्वतः करा !

     हे हिंदु शक्ती, तू जागृत हो ।

     हे हिंदु शक्ती, तू जागृत हो ॥

     राणी लक्ष्मीबाईचा हुंकार हो ।

     हे हिंदु शक्ती, तू जागृत हो ॥

     राजा शिवरायांची तलवार हो ॥

– कु. दीपाली माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.५.२०१८)