महालय श्राद्धाचा श्राद्धकर्त्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

महालय श्राद्धाचा श्राद्धकर्त्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘भाद्रपदातील कृष्ण पक्षात (पितृपक्षात) पितरांचे महालय श्राद्ध केले असता ते वर्षभर तृप्त रहातात’, अशी मान्यता आहे. यावर्षी २ ते १७ सप्टेंबर २०२० हा पितृपक्षाचा काळ आहे. या काळात केलेल्या महालय श्राद्धाचा श्राद्ध करणार्‍यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश

‘पितृपक्षात महालय श्राद्ध करणे श्राद्धकर्त्या व्यक्तीसाठी लाभदायक आहे का ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासणे, हा या चाचणीचा उद्देश आहे.

२. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत एका साधकाची २२.९.२०१६ या दिवशी महालय श्राद्ध करण्यापूर्वी आणि श्राद्ध केल्यानंतर ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या दोन्ही निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत
वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या संकेतस्थळाच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
श्राद्धविधी करतांना श्री. शॉन क्लार्क आणि बाजूला पुरोहित श्री. ओंकार पाध्ये

३. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

३ अ. श्राद्धकर्ता (चाचणीत सहभागी झालेला) साधक : आपल्या पितरांसाठी श्राद्ध करणारा तो श्राद्धकर्ता होय. चाचणीत सहभागी झालेला श्राद्धकर्ता साधक (श्री. शॉन क्लार्क) गेल्या १० वर्षांहूनही अधिक काळापासून साधना करत आहे.

३ आ. श्राद्धाचे पौरोहित्य करणारे पुरोहित : श्राद्धकर्ता, श्राद्धासाठी वापरलेली सामुग्री आणि श्राद्ध करणारा पुरोहित सात्त्विक असल्यास श्राद्धविधीची परिणामकारकता सर्वाधिक असते. या श्राद्धाचे पौरोहित्य सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी केले होते. ते नियमित साधना करत असल्याने सात्त्विक आहेत. धर्मशास्त्रातील नियमांचे काटेकोर पालन करणे, मंत्रांचे शुद्ध आणि स्पष्ट उच्चार करणे, धार्मिक विधीतील कृती परिपूर्ण अन् भावपूर्ण करणे, धार्मिक विधी करणार्‍यांना विधींतील कृतींमागील अध्यात्मशास्त्र सांगून त्याची श्रद्धा दृढ करणे आदी सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांची काही वैशिष्ट्ये आहेत. थोडक्यात सांगायचे, तर सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहित पौरोहित्यही साधना म्हणून करतात. त्यामुळे श्राद्धकर्त्याला विधी करण्यातील अधिकाधिक लाभ मिळतो.

३ इ. श्राद्धाचे स्थळ, दिनांक आणि वेळ : श्राद्धकर्त्याने २२.९.२०१६ या दिवशी साधारणपणे सकाळी १० ते सायंकाळी ४.३० या वेळेत गोवा येथील सनातन आश्रमात श्राद्धविधी केला. भाद्रपद मासातील (महिन्यातील) कृष्ण पक्षाला ‘पितृपक्ष’ किंवा ‘महालय पक्ष’ म्हणतात. या पक्षात पितरांचे महालय श्राद्ध करण्यास धर्मशास्त्रात सांगितले आहे. श्राद्धासाठी अपराण्हकाळ (दुपारी साधारणपणे १२.३० ते ३.३० ही वेळ) योग्य समजली जाते.

(श्राद्धाविषयी विस्तृत माहिती सनातनचा ग्रंथ ‘श्राद्ध’ यात दिली आहे.)

४. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ उपकरणाद्वारे २२.९.२०१६ या दिवशी केलेली निरीक्षणे, त्यांचे विवेचन आणि निष्कर्ष

टीप : स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनरच्या भुजा उघडल्या, तर त्याचा अर्थ ‘त्या घटकाभोवती प्रभावळ नाही’, असा होतो.

४ अ. सारणीतील नकारात्मक ऊर्जेसंदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

४ अ १. नकारात्मक ऊर्जा न आढळणे : सर्वसाधारण वास्तू किंवा वस्तू यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; पण चाचणीतील साधकामध्ये महालय श्राद्ध करण्यापूर्वी आणि केल्यानंतरही जराही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

४ आ. सारणीतील सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

सौ. मधुरा कर्वे

४ आ १. साधकामध्ये महालय श्राद्ध करण्यापूर्वी सकारात्मक ऊर्जा असणे आणि श्राद्ध केल्यानंतर ती पुष्कळ वाढणे : सर्वच वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही; पण श्राद्ध करण्यापूर्वीच्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा ९० अंशाच्या कोनात उघडल्या आहेत, म्हणजे साधकामध्ये थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली. महालय श्राद्ध केल्यानंतरच्या निरीक्षणात स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजे साधकामध्ये पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा आढळली आणि तिची प्रभावळ १.०२ मीटर आहे. याचे कारण श्राद्धकर्ता नियमितपणे साधना करणारा असल्याने त्याच्यामध्ये श्राद्ध करण्यापूर्वीही सकारात्मक ऊर्जा होती आणि ती श्राद्ध केल्यानंतर आणखी वाढली. महालय श्राद्धातील विधींमुळे साधकातील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण पुष्कळ वाढल्याचा तो परिणाम आहे.

४ इ. सारणीतील वस्तूच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

४ इ १. श्राद्धकर्त्या साधकाची महालय श्राद्ध केल्यानंतरची प्रभावळ महालय श्राद्ध करण्यापूर्वीच्या प्रभावळीपेक्षा पुष्कळ अधिक असणे : सामान्य व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते, तर चाचणीतील श्राद्धकर्त्या साधकाची महालय श्राद्ध करण्यापूर्वीची प्रभावळ १.३१ मीटर आहे. ती महालय श्राद्ध केल्यानंतर पुष्कळ वाढली आणि २.६४ मीटर झाली. महालय श्राद्धातील विधींतील चैतन्याचा तो परिणाम आहे.

५. निष्कर्ष

व्यक्तीला पूर्वजांचा त्रास असल्यास किंवा भविष्यात तो होऊ नये, यासाठी श्राद्ध करण्यास धर्मशास्त्रात सांगितले आहे. त्यानुसार ‘पितृपक्षात महालय श्राद्ध करणे श्राद्धकर्त्या व्यक्तीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असते’, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’

– सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा (२३.९.२०१६)

ई-मेल : [email protected]

घटकाची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरणांद्वारे अभ्यासण्याचा हेतू

‘एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत ? तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही ?’ हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द ‘प्रमाण’ मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र ‘शब्दप्रमाण’ नाही, तर ‘प्रत्यक्ष प्रमाण’ हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.