एकट्या दुबईमधून आलेल्या १०५ जणांना लागण
नवी देहली – भारतामध्ये ३० जानेवारी या दिवशी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. चीनमधील कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या वुहान शहरामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याला त्याची लागण होऊन तो केरळमध्ये परतला होता. आता सध्याच्या स्थितीत भारतात ८०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ६६ जण बरे झाले आहेत, तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनुसार कोरोनाची लागण झालेले ३०० हून अधिक जण विदेशांतून आले होते. त्यांपैकी १४२ जण दुबई, कतार, सौदी अरेबिया, इराण आदी इस्लामी देशांतून आले होते. दुबई येथून १०५ जण आलेल्या ज्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि भारतात आल्यावर ते उघडकीस झाले होते.