मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे दळणवळण बंदी असतांनाही मशिदीमध्ये नमाजपठण करण्याचा प्रयत्न

देशात सातत्याने अशा घटना घडूनही त्याविषयी राजकीय पक्ष, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी काही बोलत नाहीत कि अशांना घरातच रहाण्याचे आवाहन करत नाहीत कि नियमांचे पालन करण्यासही सांगत नाहीत, हे लक्षात घ्या !

मैनपुरी (उत्तरप्रदेश) – देशात दळणवळण बंदी असतांनाही येथील महंमद सईद मोहल्यातील एका मशिदीमध्ये नमाजासाठी जमलेल्या लोकांना पोलिसांनी घरी पाठवले; मात्र तत्पूर्वी त्यांनी पोलिसांना विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी मोठ्या संख्येने येथे फौजफाटा मागवला होता. या वेळी पोलिसांनी लोकांना घरातच नमाजपठण करण्याचा सल्ला दिला. ‘दळणवळण बंदीचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणीही पोलिसांनी त्यांना दिली.